पराभव जिव्हारी लागल्याने कुस्तीपटू रितिका फोगट ने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भारतीय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची चुलत बहिण. रितीका फोगटने आत्महत्या केल्याच्या वृत्तामुळे कुस्ती क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. रितिका फक्त १७ वर्षांची होती. भारतपूर येथे बुधवारी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचल्यान रितिकाने आत्महत्या केली.
आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील याच कुटुंबाचा भाग होती. रितिका राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धा खेळत होती. १४ मार्चला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात एका गुणाने रितिकाचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने रितिकाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.