जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला

जळगाव महानगर पालिकेत आज सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पहायला मिळाली. २७ नगरसेवक फुटल्याने मोठा धक्का बसलेल्या भाजपाने जळगाव महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ‘एमआयएम’च्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेलाच मतदान केल्याने जळगाव पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

महापौर-उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली, तर प्रतिभा कापसे यांना ३० मतं मिळाली. उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे. तर शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली.

जळगाव म्हणजे गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला.त्यांना चितपट करण्यासाठी शिव सेनेचे खासदार विनायक राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला होता. भाजपच्या फुटीर नगरसेवकांसह गुलाबराव पाटील ठाण्यातील हॉटेलमध्ये थांबले होते. ७५ सदस्य असणाऱ्या जळगाव महापालिकेत भाजपचे ५७, शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन असे संख्याबळ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.