देशाचे शिक्षण हब बनलेल्या पुणे शहरात देशाच्या कानाकोपर्यातून लोक येत असतात आत्ता पुण्याला जाणे आदिक सोपे होणार आहे. कारण खासगी विमान कंपनी स्पाइसजेट (SpiceJet) २८ मार्चपासून पुण्यातून पाच मोठ्या शहरांसाठी नॉन स्टॉप विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. दरभंगा, दुर्गापूर, ग्वाल्हेर, जबलपूर आणि वाराणसी या पाच शहरांसाठी पुण्यातून विमानसेवेला लवकरच सुरूवात होणार आहे. कंपनीने एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली. कंपनी किमान 66 नवीन फ्लाईट्स सुरु करणार आहे. शिवाय काही विशिष्ट मार्गासाठी अधिकच्या फ्लाईट सुरु करण्यात येतील. छोट्या शहरांमधून विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे UDAN योजनेअंतर्गत स्पाइसजेट आता नाशिक, दरभंगा, दुर्गापूर आणि ग्वाल्हेरला मेट्रो शहरांसोबत जोडण्यासाठी नव्या फ्लाईट्स सुरु करणार आहे. दरम्यान, नाशिक शहरावरुन दिल्ली, हैदराबाद आणि बेंगळुरु या शहरांसाठी स्पाइसजेटने सेवा सुरू केली होती, आता कोलकाता शहरासाठीही विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.