जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल , एसडी फाउंडेशन व इव्हेन्टस् , सॅटर्डे क्लब जळगाव चॕप्टर आणि भारत विकास परिषद , जळगाव शाखेतर्फे महिनाभर मतदान जनजागृती अभियान सोशल मिडीयावर राबविण्यात आले
महिन्याभरात लाखो व्यक्तीपर्यंत संदेशाचे पोस्ट पाठविण्यात आल्या.
या सर्व जनजागृती संदेशांच्या पोस्टर्स जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , रोटरी क्लब सेंट्रलचे प्रेसिडेंट कल्पेश शाह , सेक्रेटरी दिनेश थोरात, मिलन मेहता, सॅटर्डे क्लबचे चेअरमन अभिजीत वाठ , सेक्रेटरी डॉ.दीपक पाटील , जयेश पाटील, भारत विकास परिषदेचे डॉ.विकास चौधरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभियान राबवणाऱ्या या सर्व संस्थांचे अभिनंदन केले. तसेच ज्या भागातून कमी मतदान होते तेथे मतदान करण्याविषयी जनजागृती करावी असे ही आवाहन केले.