पुष्पा चित्रपटातील या अभिनेत्याची होतेय चर्चा

2021 च्या शेवटच्या महिन्यात पुष्पाने केलेला स्फोट 2022 च्या पहिल्या महिन्यातही सुरुच होता. लोकांना हा चित्रपट, चित्रपटाची कथा, चित्रपटातील पात्रे एवढी आवडली की पुष्पाच्या उत्साहाचा पारा आणखीनंच वाढत गेला. पहिला चित्रपट संपला नाही की त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून अल्लू अर्जुनच्या नाव सतत चर्चेत आहे. त्याचा दमदार अभिनय पाहून लोक थक्क होत आहेत.
पण पुष्पामध्ये भूमिका साकारणाऱ्या आणखी एका पात्राची खूप प्रशंसा होत आहे. तो कलाकार म्हणजे फहाद फासिल. क्लायमॅक्सच्या काही वेळापूर्वी त्याची एन्ट्री होते, पण अल्लू अर्जुननंतर जर कोणी लाइमलाईटमध्ये आलं असेल तर तो फहाद आहे.

अल्लू अर्जुनच्या पुष्पामध्ये फहाद फासिलची एन्ट्री क्लायमॅक्सच्या काही वेळापूर्वी होते. चित्रपटातील त्याची एंट्री सांगते की पुढचा रस्ता पुष्पासाठी सोपा असणार नाही.

तो केवळ 20 ते 25 मिनिटांसाठीच चित्रपटात दिसला होता, पण या मिनिटांतच त्याने सर्वाचं लक्षवेधलं. तेव्हापासून त्याची चर्चा होत असून लोकांना जाणून घ्यायचे आहे की फहाद फासिल कोण आहे? खरं तर, फहाद फासिल हे दक्षिणेतील प्रसिद्ध नाव आहे. ज्याने मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याच्या कामाच्या जोरावर नाव कमावले आहे.

2002 मध्ये करिअरला सुरुवात करणाऱ्या फहाद फासिलने आतापर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. फहद फासिलने 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.

पुष्पा द राइजमध्ये अल्लू अर्जुन पोलिसांना चकमा देताना दिसतो आणि तस्करीच्या व्यवसायावर राज्य करण्याचा मार्ग तयार करतो, तर पुष्पा 2 ची कथा अल्लू अर्जुन आणि फहाद फासिलवर आधारित असेल.

या कारणास्तव पुष्पा पार्ट 1 मध्ये फहाद फासिलच्या प्रवेशाला उशीर झाला. पुष्पा 2 मध्ये फहाद फसिल अल्लू अर्जुनला टक्कर देताना दिसणार आहे आणि फहादचा अभिनय पाहून हे स्पष्ट झाले आहे की, पुष्पासाठी पुढचा रस्ता सोपा नसेल.

त्यामुळे अल्लू अर्जुन पेक्षा पुष्षा 2 साठी फहाद फासिलचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्याची भूमिका दुसऱ्या भागात महत्त्वाची ठरणार असल्याचं ही बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.