बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांच्या अटकेची माहिती समोर येत आहे. एका प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. आज दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे.
एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन राज कुंद्रा यांना ही अटक केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आला होता. एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केली होती. चित्रपट बनवणाऱ्या अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती. आज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सुमारे 7 ते 8 तास चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च 2020 मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती. हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं. कुंद्रा हे यापूर्वी या कंपनीचे माजी संचालक होते. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.