आज दि.२४ जानेवारीच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

ज्ञानवापी प्रकरणातील ASI च्या अहवालाबाबत वाराणसी न्यायालयाचा मोठा निर्णय

वाराणसी येथील न्यायालयाने बुधवारी ज्ञानवापी मशीद संकुलावरील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचा वैज्ञानिक अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, हा अहवाल हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही पक्षकारांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वाराणसी जिल्हा न्यायालयात १८ डिसेंबर रोजी सीलबंद लिफाफ्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालातील निष्कर्षांचा अभ्यास दोन्ही पक्षकारांना करण्याची संधी मिळणार आहे. हिंदू बाजूचे प्रतिनिधीत्त्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, आज कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या. एएसआयच्या अहवालाची हार्ड कॉपी दोन्ही बाजूंना दिली जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अलाहबाद उच्च न्यायालयाने वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर सर्वेक्षण सुरु करण्यात आलं होतं. सर्वेक्षण केल्यानंतर न्याय आणि हक्कांच्या दृष्टीने हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पक्षकारांचा फायदा होईल असंही न्यायालयाने म्हटलं होतं. सुनावणीच्या दरम्यान मशीद प्रबंधन समितीने सर्वेक्षणावर आक्षेप घेतला होता. त्यांनी असं म्हटलं होतं की भारतीय पुरातत्व विभागाने कुठल्याही संमतीशिवाय मशिदीतल्या तळघरात आणि इतर ठिकाणी खोदकाम केलं आणि तिथले नमुने घेतले. त्यामुळे मशिदीच्या मूळ ढाच्याला धक्का लागू शकतो असंही म्हटलं होतं.

न्यायमूर्ती प्रसरमा भालचंद्र वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती प्रसरमा भालचंद्र वराळे (कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश) यांची नियुक्ती केंद्राने अधिसूचित केली.

शिंदे समितीला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला सरकारने २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिंदे समिती राज्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम करीत आहे.

सचिन पायलट यांचे भारत जोडो न्याय यात्रेबाबत मोठं वक्तव्य

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही छत्तीसगडमध्ये दाखल होत आहे. यावेळी छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी सचिन पायलट यांनी सांगितले की या यात्रेमुळे एक वातावरण निर्मिती होईल. याचा नक्कीच पक्षाला फायदा होणार आहे. ही यात्रा ऐतिहासिक होईल आणि यामुळे देशात बदल होईल असा संदेश देखील जाईल.

नरेंद्र मोदी बुलंदशहरला देणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 जानेवारीला उत्तर प्रदेशातील बुलंदशहरला भेट देणार असून तेथे ते जवळपास 19,100 कोटी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.

मुंबईत पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जाहीर!

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क येथे जमतात. यावेळी कुठलाही घातपात, किंवा अन्य घटना होऊ नयेत म्हणून मुंबई पोलिसांकडून कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश हे जारी केलेले आहेत.

 ‘अजित पवार श्रीमंतांचे नेते’; ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांची टीका

 ‘अजित पवार म्हणतात की ते सकाळी सहा वाजेपासून कामाला सुरुवात करतात. पण त्यांच्याकडे सहा वाजता कोणता शेतकरी, कष्टकरी, कामगार किंवा मध्यमवर्गीय माणूस जातो? तेव्हा फक्त सरकारी अधिकारी आणि कंत्राटदारच जातात. ते फक्त श्रीमंत उमेदवारांना तिकीट देतात. अजित पवार हे श्रीमंतांचे नेते आहेत’, अशी टीका ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी बुधवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत केली.

अयोध्येतील राममंदिरातच बांधली जाणार आणखी १३ मंदिरे

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत अंदाजे 1100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी 1400 कोटी रुपये खर्च केले जातील असा आमचा अंदाज आहे. आमच्याकडे अजून 3000 कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली.

INDIA आघाडीत बिघाडी? ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा

लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ममतांच्या या घोषणेने विरोधी INDIA आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.

न्यूझीलंडचा रचिन रविंद्र ठरला उगवता तारा! आयसीसी इमर्जिंग क्रिकेटपटूच्या पुरस्कावर उमटवला ठसा

रचिन रविंद्रची आयसीसी पुरूष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याने 2023 मध्ये अष्टपैलू म्हणून दमदार कामगिरी केली. त्याने वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये देखील न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या वर्षात 34.44 च्या सरासरीने 911 धावा केल्या आहेत तर 23 विकेट्स घेतल्या आहेत.

मनोज वाजपेयीच्या ‘The Fable’ ने रचला इतिहास! तब्बल ३० वर्षानी बर्लिन चित्रपट महोत्सवात मिळाली संधी

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीसाठी नवं वर्ष चांगलेच लाभदायी ठरताना दिसत आहे. त्याच्या द फेबल नावाच्या चित्रपटाचं बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याला विशेष स्क्रिनिंगचा मान मिळाला आहे.भारताकडून बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये पाठविण्यात आलेल्या जे चित्रपट होते त्यातून केवळ मनोजच्या द फेबल नावाच्या चित्रपटाचं समीक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. राम रेड्डी यांनी द फेबलचे दिग्दर्शन केले आहे. द फेबल या वर्षी बर्लिन चित्रपट महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसत आहे.

आरोग्य विभागाकडून अर्थसंकल्पात १६,१३३ कोटींची मागणी!

करोनामुळे आरोग्याच्या विस्ताराच्या गरजा अधोरेखित केल्या असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मांडली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी १६,१३३ कोटी रुपये मिळावे अशी मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. आरोग्याच्या विविध योजनांची अंमलबजाणी करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पाच्या किमान आठ टक्के रक्कम आरोग्य विभागाला मिळाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली आहे.( छायाचित्र – साभार गुगल)

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.