”संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये श्रीराम विराजीत आहेत, पण त्यांच्या अस्तित्वावरुन…” मोदींनी बोलून दाखवली खंत
अयोध्येत भव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. देशभरातील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.मुख्य कार्यक्रमानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गुलामीच्या मानसिकतेला तोडून राष्ट्र उभा राहात आहे. हे राष्ट्र नवइतिहास घडवणार आहे. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेची आणि घडीची चर्चा करतील. ही खूप मोठी रामकृपा आहे, आपण सगळे या क्षणाचे साक्षीदार आहोत.मोदी पुढे म्हणाले, मी सध्या दैवी अनुभव करत आहे, ज्यांच्या आशीर्वादाने हे महान कार्य पूर्णत्वास गेलं, ते दिव्य आत्मे इथेच आहेत. त्यांना मी नमन करतो. मी आज प्रभू श्रीरामांची माफीही मागतो. आमच्या तपस्येत, पुरुषार्थात कमी राहिली होती, कारण आपण इतकी वर्षे हे कार्य करु शकलो नाहीत. आज हे कार्य पूर्ण झालेलं आहे. मला विश्वास आहे, प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील.
त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास श्रीरामांना भोगावा लागला आणि सर्वांनाच वियोग सहन करावा लागला. आज आपल्याला शेकडो वर्षांचा वियोग सहन करावा लागला आहे. अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला. कित्येक पिढ्यांना भोगावं लागलं आहे. भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये भगवान राम विराजमान आहेत. संविधान अस्तित्वात आल्यानंतरही अनेक दशकं प्रभू श्रीरामांच्या अस्तिवासाठी कायदेशीर लढाई लढावी लागली. मी भारताच्या न्यायपालीकेचे आभार मानतो. त्यांनीच न्यायाची लाज राखली. न्यायामुळे प्रभू रामाचं मंदिर उभारलं गेलं आहे.
राम मंदिराच्या अभिषेकानंतर दिव्यांचा उत्सव साजरा, अयोध्या नगरी निघाली उजळून
अयोध्येसह संपूर्ण देशासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. तब्बल 500 वर्षांनंतर आज रामलल्ला अयोध्येत विराजमान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ मुहूर्तावर नवनिर्मित राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक केला. मंगळवार, 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे.
भगवान राम अयोध्येतील त्यांच्या भव्य महालात विराजमान आहेत. गर्भगृहात पूजा करून पंतप्रधान मोदींनी रामलल्लाचा अभिषेक केला. राम मंदिराच्या भव्य अभिषेकनंतर आता अयोध्येत 10 लाख दिवे लावून दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जात आहे.
भाविकांनी प्रथम हनुमानगढी मंदिरात दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दीपोत्सव कार्यक्रमासाठी शरयू घाटावर पोहोचले आहेत.
अयोध्येतून येताच पंतप्रधान मोदींचा पहिला मोठा निर्णय; “एक कोटी घरांवर…”
अयोध्यानगरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी आपले विचार प्रकट केले. “प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले तर पुढे काय? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आणि पुढील हजार वर्ष भारतावर परिणाम करेल, असे कार्य आता करायचे आहे, असे सूतोवाच त्यांनी केले. त्यानंतर पंतप्रधान पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. आज त्यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला की, आमचे सरकार एक कोटी नागरिकांच्या घरावर रूफटॉप सोलार पॅनल लावण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची सुरूवात करत आहे. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला विज बिल कमी येईलच. त्याशिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल.”
विराट कोहली बाहेर, एका जागेसाठी 2 दावेदार! कोण करणार पदार्पण?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तीन दिवस आधी विराट कोहलीने आपले नाव मागे घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, विराट कोहली बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी कोण घेणार? बीसीसीआयने अद्याप बदलीची घोषणा केली नसली तरी सध्याच्या संघानुसार या जागेसाठी दोन दावेदार आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानचा जळफळाट
अयोध्येत प्रूभ श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. देशात एक आनंदाचे वातावरण तयार झालेले पाहायला मिळाले. मात्र आपल्या शेजारी राष्ट्राला ही बाब रुचलेली नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानने या सोहळ्याचा निषेध केला आहे.पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक्सवर प्रसिद्धी पत्रक शेअर करण्यात आले आहे. “भारतामधील अयोध्या शहरातील बाबरी मशीद पाडून त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या राम मंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आम्ही निषेध करतो”, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाची राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रता प्रकरणी नोटीस; विधानसभा अध्यक्षांना दिली दोन आठवड्यांची मुदत!
जवळपास दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. यामध्ये त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. तसेच, शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांनाच वैध ठरवत त्यांच्याविरोधातील याचिका फेटाळल्या. यानंतर ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल नार्वेकरांच्या नावे नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.
शिवसेनेच्या वाघांमुळेचं हिंदुत्वावरील कलंक दूर; खासदार राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
शिवसेनेचे वाघ नसते, तर हिंदुत्वाला अनेक वर्षांपासून असलेला कलंक दूर झाला नसता. राममंदिर लढ्यात शिवसेनेचे योगदान काय, असे म्हणणाऱ्यांसाठी अयोध्येतील कारसेवेवरील ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे दालन खुले करण्यात आले आहे, डोळे उघडे ठेवून पाहिल्यास समजेल, असा हल्लाबोल शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. २२) भाजपवर केला.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आता कुणी, कितीही श्रेय घेतले तरी लोकांना शिवसेनेचे अयोध्येतील योगदान माहीत आहे.
शिवसेनेतर्फे अधिवेशनस्थळी अयोध्येतील योगदानासंदर्भात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.
मंदिर उभारलं पण मशिदीचं काय? सुप्रीम कोर्टाने जमीन देऊनही धन्नीपूरमध्ये बांधकामाला सुरुवात का झाली नाही?
अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यात आलेलं आहे. सोमवारी मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत-महंतांच्या उपस्थितीत मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. एकीकडे राम मंदिराचं काम पूर्णत्वाकडे जात आहे, मात्र दुसरीकडे धन्नीपूरमधील मशिदीचं बांधकाम सुरु होत नाही.दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येपासून २५ किलोमीटर लांब धन्नीपूर गावात ५ एकर जमीन वितरित केली होती. त्यानंतर २६ जानेवारी २०२१ रोजी प्रस्तावित मशीद बांधकामाची कोनशिला ठेवण्यात आली होती. मात्र अजूनही मशीदीचं बांधकाम सुरु झालेलं नाही.
अयोध्येतील युपी सुन्नी सेंट्रल बोर्ड वक्फ उपसमितीचे अध्यक्ष आजम कादरी यांनी ‘द क्विंट’ला एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, मशीद निर्माणासाठी होत असलेल्या उशिरामागे एक कारण आहे. पहिलं हे की, अयोध्या विकास प्राधिकरणाकडून ‘मॅप’ला मंजुरी मिळत नाहीये.
त्याशिवाय बोर्डाकडून त्या जमिनीवर एक ग्रंथालय बनवण्याचा विचार आहे. परंतु आता मशिदीच्या बाजूला एक कॅन्सर हॉस्पिटल बनवण्याचा आमचा निश्चय झाला आहे. त्यामुळे आम्हाला आणखी जमिनीची गरज पडणार असल्याचं कादरी यांनी सांगितलं.
अयोध्येला फक्त 1,622 रुपयांत हवाई प्रवास करण्याची संधी; इतके दिवस आहे ऑफर
अयोध्येतील राम मंदिरात आज दुपारी 12.30 वाजता (12.29 वाजता) श्री रामलल्लाच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पीएम मोदींनी रामलल्लाची आरती केली आणि प्रभू रामाच्या मूर्तीला नमस्कार केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी संतांचे आशीर्वाद घेतले.या सोहळ्यानंतर आता सर्वांनाच रामाच्या दर्शनाची उत्सुकता लागली आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी देशातील सर्व विमान कंपन्या व्यस्त आहेत. अनेक प्रकारच्या ऑफर्सही दिल्या जात आहेत. आता विमान कंपनीने मर्यादित कालावधीसाठी अयोध्येला स्वस्तात प्रवास करण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर स्पाइसजेटकडून देण्यात आली आहे.फक्त 1622 रुपयांमध्ये अयोध्येचा विमान प्रवास करता येणार आहे. तिकिटांची विक्री आजपासून म्हणजेच 22 जानेवारीपासून सुरू झाली आहे. जी सुमारे आठवडाभर म्हणजे 28 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
सूर्याकडे आयसीसीच्या टी-20 संघाचं नेतृत्व
सध्या 2024 हे वर्ष सुरू आहे आणि या वर्षी टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे, जो जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मधील टी-20 आंतरराष्ट्रीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या 11 खेळाडूंमध्ये जगभरातील खेळाडूंसोबतच भारतीय संघातील खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला त्याचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
मुंबई मॅरेथॉनमध्ये इथियोपियन धावपटूंचे वर्चस्व
मुंबई मॅरेथॉनमध्ये इथियोपियन धावपटूंचेच वर्चस्व दिसून आले. एलिट पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांतील पहिल्या तीन स्थानांवर इथियोपियाच्याच खेळाडूंनी नाव कोरले. पुरुष विभागात हायले लेमी याने; तर महिला विभागात अबराश मिनसेवो हिने जेतेपदावर नाव कोरले.पुरुष विभागात इथियोपियाच्या तीनही धावपटूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. पहिल्या २० किमी व त्यानंतर ३० किमीपर्यंतच्या प्रवासावर नजर टाकल्यास तीनही खेळाडूंमध्ये जास्त अंतर नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अखेरच्या टप्प्यात हायले लेमी याने बाजी मारली व पहिल्या स्थानावर झेप घेतली.
समंथा विमानातच करत होती नशापाणी, पोलिसांनी केली अटक!
पॉप आयकॉन समंथा फॉक्ससंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. तिला लंडनच्या विमानतळावर नशेच्या अवस्थेत पोलिसांनी पकडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी तिला अटकही केली आहे.१९८० च्या दशकांतील प्रमुख गायिका समंथा फॉक्सला पोलिसांनी अटक केल्याचे दिसून आले आहे. तिला लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अटक करण्यात आली असून सोशल मीडियावर तिच्याविषयीची ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. समंथा विमानतच नशापाणी करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता.
महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी राहुल नार्वेकरांची मोठी घोषणा
अयोध्यानगरीत आज (२२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उद्यापासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जातील. महाराष्ट्रातील भाविकही अयोध्येला जातील. दरम्यान, महाराष्ट्रातील भाविकांसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, राज्य सरकारकडून महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी अयोध्येत भक्त धर्मशाळा बांधली जाईल.महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले, मी तुम्हा वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांसाठी, त्यांच्या निवसासाठी भक्त धर्मशाळा उभारली जाईल. लोकांना तिथे राहता यावं यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अयोध्येत इमारत उभारली जाईल.
मनोज जरांगेंची पदयात्रा उद्या पुण्यात; कडक पोलीस बंदोबस्त
मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा मंगळवारी (२३ जानेवारी) नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत. त्यानिमित्ताने नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
SD Social Media
9850603590