अयोध्येतील सोहळ्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर उद्घाटन आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त राज्य सरकारने सुट्टी जाहीर केलेली आहे. तसेच आता मुंबई विद्यापीठानेही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.२२ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या १४ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सोमवार, दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिन असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
निकाह ‘जाहीर’ केल्यानंतर अवघ्या काही तासात मलिकने टी 20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक आज दिवसभर प्रकाशझोतात आहे. त्याने नुकतेच अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केल्याचं जाहीर केलं. हा शोएबचा तिसरा निकाह आहे. या वृत्तानंतर त्याने सानिया मिर्झासोबतचा संसार मोडलाय यावर शिक्कामोर्तब झालं.दरम्यान, सना जावेदसोबत निकाह झाल्याचं जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासात शोएब मलिकने टी 20 क्रिकेटमध्ये एक माईल स्टोन पार केला. शोएब मलिक हा टी 20 क्रिकेटमध्ये 13000 धावा पूर्ण करणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्युन बरिशालसंघाविरूद्ध रंगपूर रायडर्सकडून खेळताना ही कामगिरी केली.
भारत – बांगलादेशचे कर्णधार भिडले; पंचांनी केली मध्यस्थी
19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये आज भारताने आपली मोहीम सुरू केली. गतविजेत्या भारताचा आज पहिलाच सामना हा कडवट बांगलादेश सोबत होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 7 बाद 251 धावा केल्या. कर्णधार उदय सहारनने 64 धावांची खेळी करत महत्वाचे योगदान दिलं. तर सलामीवीर आदर्श सिंगने 76 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचली.दरम्यान, सामन्यावेळी भारताचा कर्णधार उदय सहारन आणि बांगलादेशचा कर्णधार महफिजूर रहमान राबीसोबत वाद झाला. उदय आणि अरिफुल इस्माल हे एकमेकांसमोर आले होते. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार महफिजूर रहमान राबी देखील मधे पडला होता. अखेर प्रकरण वाढत असल्याचं पाहून पंचांनी मध्यस्थी करत दोन्ही देशांच्या खेळाडूंना बाजूला केलं. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रात औषध निरीक्षक पदासाठीची अट शिथिल
राज्यातील औषधांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषध निरीक्षकांसाठी औषध उत्पादनातील चार वर्षे कामाच्या अनुभवाची अट राज्य सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे आता बी.फार्मा ही पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना औषध निरीक्षक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अपुऱ्या औषध निरीक्षकांमुळे औषध तपासणीत येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.राज्यातील नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण औषध मिळावेत यासाठी राज्यातील औषधांच्या दुकानांमध्ये विक्री होणाऱ्या औषधांचा दर्जा, गुणवत्ता तपासणे, औषध विक्रेत्यांची तपासणी करणे यासाठी औषध निरीक्षकांची अन्न व औषध प्रशासनाने नियुक्ती केली आहे. औषध निरीक्षकाच्या पदासाठी औषध निर्मात्या कंपन्यांमध्ये औषध उत्पादनाचा चार वर्षे अनुभव असावा, अशी अट बंधनकारक आहे. मात्र बी.फार्मा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना चार वर्षांचा कामाचा अनुभव नसल्याने त्यांना औषध निरीक्षक पदासाठी अर्ज करता येत नाही.
सौम्य पांडेचा भेदक मारा; पहिल्या सामन्यात भारतानं बांगलादेशला लोळवलं
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत गतविजेत्या भारताने विजयी सुरूवात केली. आपल्या पहिल्याच सामन्यात भारताने बांगलादेशचे आव्हान परतवून लावले. प्रथम फलंदाजी करत 251 धावा करणाऱ्या भारताने बांगलादेशला 167 धावात रोखलं. भारताने पहिला सामना 84 धावांची दणदणीत विजय मिळवला.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून ७ तास चौकशी
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून ७ तास चौकशी करण्यात आली. ईडीनं सोरेन यांच्या घरुन गेल्यानंतर CM सोरेन यांनी घराबाहेर जमलेल्या समर्थकांना संबोधित केलं. ईडीकडून माझ्याविरोधात कट-कारस्थान रचलं जात आहे. पण काळजी करु नका यांच्या कारस्थानांना भारी पडत मी राज्याचा विकास करत राहणार आहे, असं त्यांनी म्हटलं.
हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसचं दमदार कमबॅक, सई ताम्हणकरसोबतचं नवं गाणं
अभिनेता श्रेयस तळपदे हा मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. श्रेयसला आपण अनेक मराठी, हिंदी मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून पाहिलंय. पुष्पा सिनेमातून श्रेयसने त्याच्या दमदार आवाजाची जादू संपूर्ण भारताला दाखवून दिली.श्रेयसला काहीच दिवसांपुर्वी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे सर्वांना चिंता वाटली. पण आता श्रेयसचं दमदार कमबॅक झालंय. श्रेयसचं सई ताम्हणकरसोबत नवीन गाणं भेटीला आलंय.
अभिमानाचा क्षण! न्यूझीलंडमध्ये हॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीत ‘सत्यशोधक’चा प्रिमियर
महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. ‘सत्यशोधक’ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. सिनेमाचं तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण झालंय.
अशातच ‘सत्यशोधक’ सिनेमाबद्दल मोठी बातमी समोर आलीय. ज्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना नक्कीच आनंद होईल.
सत्यशोधक सिनेमाच्या टीमने त्यांच्या सोशल मीडियावर एक खास बातमी शेअर केलीय. फेब्रुवारी २०२४ मध्ये न्यूझीलंडमध्ये ‘सत्यशोधक’चा प्रिमियर होणार आहे. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे हा प्रिमियर सोहळा आयोजित करण्यात आलाय.
न्यूझीलंडमधील राजदूत, हॉलिवूड स्टार्स यांच्या उपस्थितीत न्यूझीलंडच्या राजधानीत ‘सत्यशोधक’ सिनेमाचा रेड कार्पेट प्रीमियर फेब्रुवारी २०२४ मध्ये रंगणार आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रथमच ही घटना घडली आहे. त्यामुळे सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
SD Social Media
9850603590