स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत किती बदल झाला? विश्वास नाही बसणार
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात देशाने अनेक चढउतार पाहिले. भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. यासोबतच एक नवीन आर्थिक शक्तीही उदयास आली. भारत आज सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. एकीकडे संपूर्ण जग मंदीच्या धोक्याने होरपळत असताना दुसरीकडे भारत मात्र यापासून मुक्त असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांत देशात महागाईही वाढली आणि अनेक वस्तू आणि सेवांच्या जुन्या किमती आज स्वप्नवत वाटत आहेत. 1947 आणि 2022 मधील काही वस्तूंच्या किमतींची तुलना करा. त्यात जुन्या किमती पाहून तुम्ही थक्क व्हाल. तेव्हाच्या आणि आताच्या किमती पाहू.
तेव्हा आणि आताच्या किमती किती बदलल्या आहेत?
1947 मध्ये एक किलो तांदूळ 12 पैशांना मिळत होता, जो आज 40 रुपये किलोने विकला जातो. तसेच साखर तेव्हा 40 पैसे प्रतिकिलो होती, पण आज 42 रुपये किलो आहे. बटाटा 25 पैशांवरून 25 रुपयांवर गेला आहे. दूध 12 पैशांवरून 60 रुपये लिटर वर पोहोचलं. आज पेट्रोल 97 रुपये लिटर आहे पण 1947 मध्ये तुम्हाला एक लिटर पेट्रोल फक्त 25 पैशांना मिळायचे. जिथे आज सायकलची किंमत 8,000 रुपये आहे, 1947 मध्ये ती फक्त 20 रुपयांना मिळत होती. तुम्ही फ्लाइटमध्ये फक्त 140 रुपये खर्च करून दिल्ली ते मुंबई जाऊ शकत होता. मात्र, आता तुम्हाला यासाठी सुमारे 7,000 रुपये खर्च करावे लागतील. त्याचप्रमाणे महागाईशी लढण्याचे हत्यार असलेले सोने 1947 मध्ये 88 रुपयांना 10 ग्रॅम होते. आज तेच सोने 52 हजार रुपयांवर पोहोचले आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करतोय
15 ऑगस्ट रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्याची आठवण म्हणून सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. या अंतर्गत सरकार ‘घरोघरी तिरंगा’ कार्यक्रम राबवत आहे. लोकांना 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी राष्ट्रध्वज लावण्यास प्रवृत्त करत आहे. केंद्राने यासाठी राष्ट्रध्वजाशी संबंधित काही नियमांमध्ये सुधारणाही केल्या आहेत. त्याचबरोबर यावेळी पोलीस आणि निमलष्करी दलांना विशेष पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. या पदकाचे नाव इंडिपेंडन्स अॕनिव्हर्सरी मेडल असून त्याची घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली होती.