वाहन चालकांना आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र आता पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. याचा फायदा देशातील इंधन विक्रीवर होण्याची शक्यता आहे. गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महापालिका निवडणुका देखील येत्या काळात जाहीर होऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होऊ शकते.