आंदोलनाविरोधात पोलीस अॅक्शन मोडमध्ये
विद्यमान विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याविरोधात नुकतंच प्रारूप आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. वाढीव विज बिलाविरोधात आंदोलन करणं या दोघांनाही महागात पडलं आहे. मुंबईतील बेस्टच्या कथित वाढीव वीजबिलांच्या प्रश्नावर जुलै 2020 मध्ये टाळेबंदीच्या काळात आक्रमक आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी बेस्टच्या कार्यालयात घुसून बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी गैरवर्तणूक आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली दाखल खटल्यात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेकांनी जमावबंदीचा आदेश मोडत आंदोलन केलं आणि बळाचा वापर करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना त्यांचं कर्तव्य करण्यापासून रोखलं, असा आरोप आहे. याप्रकरणाच्या तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं गेलं आहे.
या कलमांतर्गत गुन्हा –
पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 353 (हल्ला करून किंवा बळाचा वापर करुन सरकारी सेवकाला कर्तव्य करण्यापासून रोखणे), 341 (अवैधरित्या प्रतिरोध करणे), 332 (सरकारी सेवकाला जाणीवपूर्वक इजा पोचवणे), 143 (अवैध जमाव जमवणे), 147 (दंगल घडवणे), सार्वजनिक मालमत्तेच नुकसान प्रतिबंधक कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे