खरिपासह रब्बी हंगामातील शेतीमालाची आवक वाढली आहे. शिवाय खरेदी केंद्राचाही शेतकऱ्यांना लाभ होत आहे. खरिपातील सोयाबीन, तूर या मुख्य पिकांची तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असताना आता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार हे होळीनिमित्त बंद असणार आहेत.
मध्यंतरी दीपावलीमुळे काही दिवस व्यवहार हे बंद होते तर आता होळीमुळे राज्यातील लातूर, लासलगाव, सोलापूर, मालेगाव, नाशिक या बाजार समित्यांचा समावेश आहे. दरवर्षी होळीनिमित्त बाजार समित्या ह्या बंद असतात. यामध्ये पणन महामंडळाचा महत्वाची भूमिका असते पण स्थानिक पातळीवर हा निर्णय बाजार समिती प्रशासनच घेते. त्यामुळे काही बाजार समित्या ह्या दोन दिवसासाठी तर काही 5 दिवसांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र, चांगलीच पंचाईत होणार आहे.
होळी निमित्त लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे 5 दिवस बंद असणार आहेत. गुरुवारपासून येथील व्यवहार बंद राहणार आहेत. सलग पाच दिवस व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. भाजीपाला आणि फळांचे व्यवहार सुरु राहणार आहेत. तर कांदा नगरी असलेल्या लासलगावातील कांद्याचे व्यवहार हे दोन बंद राहणार आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे सलग पाच दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या निर्णय हा स्थानिक पातळीवर झालेला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे सुरुच राहणार आहेत. मध्यंतरी दीपावली दरम्यान येथील बाजारपेठ ही तीन दिवस बंद होती. मात्र, सध्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद राहणार असले तरी भाजीपाला आणि इतर किरकोळ व्यवहार हे सुरुच राहणार आहेत. सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यातच काही बाजार समित्या ह्या 5 दिवस तर काही 2 दिवस बंद राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे व्यवहार हे सुरुच राहणार आहेत.