कार मध्ये सापडले नोटांचे घबाड, मोजता मोजता झाली संध्याकाळ

राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचं घबाड सापडलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती. नोटा एवढ्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. त्यामुळे पोलीस आणि अधिकारीही चक्रावून गेले.

कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, असं सांगितलं जातं. तसेच हा सर्व पैसा हवाल्याचा असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नॅशनल हायवे रस्ता क्रमांक 8 वर एक कार अडवली. या कारची तपासणी केली असता त्यात नोटांचं घबाड आढळून आलं. एक दोन लाख नव्हे तर तब्बल 4.5 कोटी रुपये या कारमधून जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. हा पैसा हवाला मार्गे आला असावा, असं डीएसपी मनोज सवारियां यांनी सांगितलं.

कारमध्ये प्रचंड प्रमाणात नोटा सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. ही रक्कम किती असेल याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. शिवाय हाताने नोटा मोजणंही शक्य नव्हते. पोलीस ठाण्यात नोट मोजण्याची मशीन नव्हती. त्यामुळे बँकांमधून नोट मोजण्याची मशीन मागवण्यात आली. सकाळपासून मशीनने या नोटा मोजण्यात आल्या. नोटा मोजता मोजता संध्याकाळ झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली. ही संपूर्ण रक्कम 4.5 कोटी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. DL8CA X3573 या क्रमांकाच्या गाडीत या नोटा सापडल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

बिछीवाडा पोलीस ठाणे हे गुजरातच्या हिम्मत नगर बॉर्डरवर आहे. येथून नॅशन हायवे जातो. या ठिकाणी नेहमीच तस्करी केली जाते. त्याचा पोलिसांकडून वेळोवेळी पर्दाफाशही केला जातो. मात्र, बिछीवाडा पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जप्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.