बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या अक्षय होम क्वारंटाइन आहे. अक्षयने ट्विट करत कोरोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. “मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी मी विनंती करतो की त्यांनी स्वत: कोरोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. लवकरच अँक्शनमध्ये परत येईल” अशा आशयाचं ट्विट करत अक्षयने त्याला कोरोनाची लागन झाल्याची माहिती सगळ्यांना दिली आहे.