राज्यात तापमानवाढीची शक्यता

विदर्भ वगळता राज्यात इतरत्र सध्या दिवसाच्या कमाल तापमानात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत घट झाली असली, तरी दोन ते तीन दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात ५ ते ७ एप्रिल या कालावधीत उष्णतेची दुसरी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्यातील तापमानात वाढ झाली होती. उत्तरेकडील काही राज्ये आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट होती. राज्यात कोकण विभागापाठोपाठ विदर्भातही उष्णतेची लाट आली होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत गेला होता. सध्या दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतरत्र तापमान सरासरीच्या जवळ आणि ४० अंश सेल्सिअसच्या खाली आहे. कोकण विभागातही बहुतांश ठिकाणी तापमान कमी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.