लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेते घनश्याम नायक म्हणजे ‘नट्टू काका’ सध्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घनश्याम नायक कोरोनामुळे शूटिंगपासून दूर होते. एप्रिल महिन्यात ‘नट्टू काकां’ची भूमिका साकारणार्या ‘तारक मेहता..’च्या या ज्येष्ठ अभिनेत्याच्या मानेवर काही डाग दिसू लागले, त्यानंतर डॉक्टरांना कॅन्सर झाल्याची पुष्टी केली. ज्यासाठी ते सध्या केमोथेरपी घेत आहे. तथापि, सध्या ते पूर्णपणे ठीक आहे आणि मुंबईत पुन्हा शुटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहे.
ऑनलाईन पोर्टलशी बोलताना ते म्हणाले की, “मी पूर्णपणे ठीक आणि निरोगी आहे. ही फार मोठी समस्या नाही. इतकेच नाही तर लवकरच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांना मालिकेतील माझे काम पुन्हा पाहायला मिळेल. हा एक विशेष भाग आहे आणि मला आशा आहे की, त्यांना पुन्हा माझे काम नक्कीच आवडेल.”
घनश्याम नायक त्यांच्या उपचारांविषयी बोलताना म्हणाले, “हो, माझा उपचार अद्याप सुरु आहे आणि मला खात्री आहे की मी लवकरच ठीक होईन. माझ्यावर सुरु असलेल्या उपचारातून मला दिलासा मिळाला आहे. मी महिन्यातून एकदा केमोथेरपी घेतो. डॉक्टरांनी मला सांगितले की, मी काम करू शकतो आणि त्यात कोणतीही अडचण नाही. मी फक्त सकारात्मकता पसरवू इच्छितो आणि सर्वांना सांगू इच्छितो की मी पूर्ण ठीक आहे.”
नुकताच नट्टू काकांनी दमणमध्ये एक एपिसोड शूट केला. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, तारक मेहताच्या कलाकारांसोबत काम करणे मला खूप आवडते. ते पुढे म्हणाले की, मला खात्री आहे की मी 100 वर्षे जगणार आहे आणि मला काहीही होणार नाही. घनश्याम नायक यांना असे वाटेत की, कोरोनाला घाबरून घरी बसण्यापेक्षा काळजी घेउय्न काम केले पाहिजे. ते म्हणतात, मला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि मारताना देखील चेहऱ्यावर मेकअप घेऊन जाणार आहे.