भारताची महिला टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिने क्लास 4 टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय आहे. तिने उपांत्य फेरीत चिनी पॅडलर झांग मियाओचा 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 असा पराभव करून ही कामगिरी केली. भाविना पटेल अंतिम फेरीत पोहचल्याने भारतासाठी रौप्य पदक आता निश्चित झाले आहे. आणि, जर आता असलेल्या सुपर फॉर्ममध्ये तिने जर ऐतिहासिक कामगिरी केली आणि अंतिम फेरीही जिंकली तर ती भारताला टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या इतिहासातील 5 वे सुवर्णपदकही मिळवून देईल.
भाविना पटेलचे हे पहिले पॅरालिम्पिक आहे आणि तिच्या पहिल्याच प्रयत्नात तिने क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या मंचावर उत्तम कामगिरी केली आहे. अहमदाबादच्या 34 वर्षीय भाविनाने यापूर्वी उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले होते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आणि 2016 च्या रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिच रॅन्कोवीला उपांत्यपूर्व फेरीत सरळ गेममध्ये 3-0 ने पराभूत केले होते आणि आता उपांत्य फेरीत तिने चीनी पॅडलरला 3-2 ने पराभूत केले.
भाविनाचे लक्ष्य आता सुवर्णपदक आहे, कोणत्याही परिस्थितीत मी सुवर्णपदक जिंकणारच, असा तिचा विश्वास आहे. अंतिम फेरीत मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करीन आणि सामना जिंकेल, असं पहिली पॅरालिम्पिक खेळणारी भाविना म्हणाली. जेव्हा मी इथे खेळायला आली होती, तेव्हाही मी फक्त या विचारात होती की फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावं आणि सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी आणि आतापर्यंत णी हेच करत आहे. आता फक्त एका सामन्यााचा विषय आहे, असं भाविना म्हणाली.
टोकियो पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत भाविनाने अंतिम फेरी गाठत रौप्य पदक मिळवले आहे. सुवर्णपदक जिंकण्याचं तिचं लक्ष्य आहे आणि ज्या सुपर फॉर्म मध्ये भाविना आहे, ते पाहून ती सुवर्णपदक सुद्धा नक्की जिकेंल, असा विश्वास भारतीयांना वाटत आहे.