बुधवारी काबूल विमानतळावर बॉम्बस्फोट झाले होते. यात 13 अमेरिकेच्या सैनिकांसह 170 लोक मारले गेले होते. . या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंसनं घेतली होती. यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले होते, की अमेरिका आपल्या शत्रूंना शोधून मारेल. अशात आता अमेरिकेनं या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देत पूर्व अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला केला आहे. पेंटागननं याबद्दलची माहिती दिली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, सैन्यानं हा हल्ला नानगहर प्रांतात केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं अमेरिकेच्या नागरिकांना विमानतळाच्या वेगवेगळ्या गेट्समधून तात्काळ बाहेर काढण्यास सांगण्यात आलं आहे. यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं, की अमेरिकी सैन्याच्या जवानांनी एका ISIS-K प्लॅनरच्या विरोधात दहशतवादविरोधी अभियान चालवलं जात आहे. इस्लामिक स्टेट खुरासननं काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यानं आयएसचं किती नुकसान झालं याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.