पंजाबच्या घटनेमागे अमित शहा यांचा हात तर नाही ना? : नाना पटोले

पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना?, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. असं करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितलं पाहिजे, अशा शंका पटोले यांनी उपस्थित केल्या.

पण पाच राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी नौटंकी सुरू आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई बेरोजगारी जनतेचे प्रश्न यावरील विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीने काम करत असते. पंतप्रधान रोज अनेक रुप बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केलं. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरू असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी व्हावं, असंही ते म्हणाले.

मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला. त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना आतंकवादी,. दहशतवादी आणि आंदोलनजीवी ठरवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत, असंही ते म्हणाले. आम्हाला सीरिअसली घेऊ नका. आम्ही शेतकऱ्यांची मुल आहोत. आता शेतकरी आणि मतदार राजा तुम्हाला घरी बसवेल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांच्यावर टीका केली आहे. नाना पटोलेंना कधी कोणी सीरिअसली घेत नाही. ते राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांचं ऐकतो. पण एरव्ही ते कधीच सीरिअस नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी सीरिअसली बघत नाही, असं पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.