“कु. सकिना सैफीनी लिहिलेल्या ’10 सिक्रेटस् स्टेप्स टूवर्ड सक्सेस’ या इंग्रजी पुस्तकात जे मुद्दे विषय निवडले आहेत ते तरुण, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या वयात येणा-या नकारात्मक विचारसरणीतून हे पुस्तक विद्यार्थ्यांना बाहेर काढून सकारात्मक विचार देईल!” असे विचार माजी कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील यांनी मांडले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांचे हस्ते त्यांच्याच निवासस्थानी कु सकिना सैफी लिखित’ 10 SECRETE STEPS TOWARDS SUCCESS ‘ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच घरगुती वातावरणात पार पडले. त्यावेळी प्रा. पाटील बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॕन्ड रिसर्च ‘कॉलेज च्या प्राचार्या डॉ शिल्पा किरण बेंडाळे व ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी उपस्थित होते.
प्रारंभी श्री मुर्तजा सैफी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कु· सकिना सैफी हिने आपल्या पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त केले. कु.सकिना म्हणाली की मी या पुस्तकात जीवनातील आलेले अनुभव व जे ऐकले ते लिहिले आहे.
माजी कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. बोलताना ते म्हणाले की एवढ्या कमी वयात अनेक महत्वाचे मुद्दे घेवून इंग्रजीत पुस्तक लिहिले ही कु सकिना सैफी यांचे साठी अभिमानाची व गौरवास्पद गोष्ट आहे. हे पुस्तक महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांमधील नकारत्मक विचारही दूर करण्यासाठी हे महत्वाचे आहे. मराठी व हिंदीतूनही हे पुस्तक खूप पुस्तके लिहिण्याची सुचनाही प्रा. पाटील यांनी लेखिका कु. सकिना सैफी यांचे कौतुकही केले. प्राचार्या डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी कु सकिनाचे कौतुक केले.