घरात सकारात्मक ऊर्जा असल्यास सगळ्या गोष्टी नीट होतात. घरात नकारात्मक ऊर्जा असणे खूप वाईट आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे मिठाचा उपयोग करुन नकारात्मक ऊर्जा (how to remove negative energy by using salt) नष्ट करता येते. जाणून घ्या मिठाचे काही उपाय-
घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी काचेच्या एका बाऊलमध्ये समुद्री मीठ आणि ५ लवंगा घ्या. हा बाऊल घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. या उपायामुळे घरातील पैशांची कमतरता दूर होते. घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील सुख- समृद्धी येते. घरात सौहार्दाचे वातावरणात निर्माण होतं.मीठ व लवंग घेऊन पाणी मिसळून हे पाणी घरात शिंपडल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होतं.
बाथरूममुळे वास्तु दोष निर्माण होतो. अशात काचेच्या बाऊलमध्ये मीठ घेऊन बाथरुमच्या एका कोपऱ्यात ठेवा. त्यानंतर हात लावू नका. थोड्या थोड्या दिवसांनी बाऊलमधील मीठ बदलत राहा. अशा प्रकारे बाथरूममधील सर्व प्रकारचे वास्तु दोष नष्ट होतातबाथरूममध्ये काचेच्या बाऊलमध्ये मीठ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगलं राहतं तसंच मानसिक तणावापासून सुटका होतो. यामुळे घरातून नकारात्मक उर्जा दूर होते.
मिठ्याच्या पाण्याने आंघोळ केल्याने थकवा दूर होतं. नकरात्मक विचार दूर होतात. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर तरतरीत व ऊर्जावान जाणवतं. याने फ्रेशनेस वाढते आणि मेंदूतील वाईट विचार देखील दूर होतात.
घराच्या कोपर्यांमध्ये मिठाचं पाणी ठेवून देखील सकारात्मक ऊर्जा मिळवू शकता पण हे बदलताना घरात कुठेही न सांडता थेट फ्लश करावं.