Royal enfield ची ही बाईक तुम्हालाही आवडेल

Royal enfield या कंपनीची बाईक रस्त्यावरून जात असताना त्याचा होणारा आवाज आणि ती बाईक चालवताना झळकणारा रुबाब हे सारंकाही बऱ्याच बाईकप्रेमींना हवंहवंसं वाटणारं. सध्याच्या घडीला एनफिल्डला मिळणारी लोकप्रियता कमी झाली नसली, तरीही या बाईकला टक्कर देण्यासाठी बजाज आणि ट्रायम्फ यांनी काबी नव्या बाईक बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे.

हे पाहता आता एनफिल्डनंही 4-5 नव्या बाईकचं अनावरण करण्याचं ठरवलं आहे. हंटर 350 ही त्यापैकीच एक असून, मीटिओर 350 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे.

ही नवी मोटरसायकल मीटिओर 350 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे. एनफिल्डची हंटर 350 बी जे प्लॅटफॉमवर साकारली जाईल. यामघ्ये 349 सीसी इंजिन, 22 बीएपची पॉवर आणि 27 पीक टॉर्क तयार करेल.

यासोबत कंपनीकडून 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात येईल, असं म्हटलं जात आहे, की या नव्या मोटरसायकलचं वजनही तुलनेने कमी असेल. सेमी डिजिटल कंसोल आणि ट्रिपर नॅव्हिगेशन सिस्टममुळं ही बाईक आणखी लक्षवेधी ठरत आहे. भारतात या बाईकला CB350RS, जावा स्टँडर्ड 300, जावा फोर्टी टू आणि बेनेली इंपीरियाले यांची टक्कर असणार आहे. अंदाजे या बाईकसाठी एक्स शोरूम किंमत 1.70 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यामुळे एनफिल्ड घेऊन ऑफरोडिंगला निघण्याच्या बेतात असाल तर या बाईकसाठी वाट पाहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.