जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार

जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. डंके चोटपर आमचा लढा सुरूच राहील, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज स्पष्ट केलं. ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते.

गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिवसभर एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. आम्ही उघड्या आकाशाखाली बसलो आहोत. आम्ही कष्टकऱ्यांचा लढा सुरूच ठेवणार आहोत. डंके की चोटपर आमचा लढा सुरूच राहील. आम्ही माघार घेणार नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सदावर्ते यांनी सांगितलं.

देशभरातील लोक कष्टकऱ्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आमचा आजही बंद आहे. 95 टक्के कष्टकरी दुखवट्यात आहेत. आमच्यासाठी दुखवटा आहे. सरकारसाठी संप आहे. कोल्हापूरच्या टोलनाक्यावर संतोष शिंदे आणि इतरांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासोबतच्या 35 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्याला फोन लावून कारणं विचारली. या कर्मचाऱ्यांना नाहक सहातास डांबून ठेवण्यात आलं होतं. आम्ही आमचा कायद्याचा बडगा दाखवला तेव्हा फ्यॅ फ्यॅ झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घळवे यांना विचारमा करण्यात आल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना सोडण्यात आलं. हे कर्मचारी कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना अटक केली. त्यांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. त्यांनी कोणतीही निदर्शने केली नाही. तरीही अटक केली. त्यामुळे संतोष घोळवेंना निलंबित करा, अशी आमची मागणी आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज नंदूरबार आगारात जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. राज्यातील एसटीची होत असलेली तोडफोड सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासण्याची गरज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकातील आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांची भूमिका समजून घेतली. सरकारची पगारवाढ आभासी असून कर्मचाऱ्यांनी किती लाभ होतो याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शासनाने दडपशाहीने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडू नये, शरद पवारांनी विलीकरणाचा शब्द पाळावा, आम्ही सरकारचे अभिनंदन करु, असं दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.