रशिया आणि यूक्रेन यांच्यातील तनाव वाढत चालला आहे. रशियाकडून हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाने आपला प्रतिस्पर्धी यूक्रेन वर हल्ल्याची तारीख देखील निश्चित केल्याचं बोललं जात आहे.
WION च्या बातमीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पश्चिमेकडील देशांसोबत रशिया-यूक्रेन वादावर चर्चा केली. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे 16 फेब्रुवारी रोजी यूक्रेन वर घातक हल्ला करु शकतात अशी शक्यता वर्तवली.
पोलिटिकोच्या नुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ब्रिटेन, जर्मनी, इटली, कॅनडा, पोलँड, रोमानिया आणि फ्रान्सच्या नेत्यांसह नाटो महासचिव आणि युरोपीयन आयोगाचे अध्यक्ष यांच्यासोबत देखील चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, जो बायडेन (Joe Biden) यांनी मिसाईल आणि सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी शुक्रवारी म्हटलं होतं की, रशिया कधीही हल्ला करु शकतो. विंटर ऑलिम्पिकनंतर ही रशिया हल्ला करु शकतो. चीनमध्ये सुरु असलेले विंटर ऑलिम्पिक 20 फेब्रुवारी रोजी संपणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन नाटोमध्ये सहभागी असलेल्या पोलँडच्या सुरक्षेसाठी 3 हजार जवान पाठवणार आहे. हे जवान पोलँडमध्ये आधीच तैनात 1700 जवानांसोबत जुडतील.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झालं तर अमेरिका त्यात सहभागी होणार नाही. असं अमेरिकेने आधीच म्हटलं आहे. पण गरज पडली तर तो युक्रेनला घातक हत्यारं आणि ट्रेनिंग देईल.