मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 98 धावांचं आव्हान मुंबईने 31 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. मुंबईने 14.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 103 धावा केल्या. तर मुंबईचा हा या हंगामातला तिसरा विजय ठरला. सोबतच चेन्नईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं.
मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 34 धावा केल्या. कॅप्टन रोहित शर्माने 18 धावांचं योगदान दिलं. हृतिक शौकीनने 18 रन्स केल्या. तर टीम डेव्हिडने 16 रन्स काढल्या. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. सिमरजीत सिंह आणि मोईन अली या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
चेन्नईची बॅटिंग
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नई 16 ओव्हरमध्ये 97 धावांवर ऑलआऊट झाली.
चेन्नईकडून कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. धोनी व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही.
मुंबईकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुमार कार्तिकेय आणि रिले मेरिडथ या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रमनदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी एक एक विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रमनदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेविड, डेनियल सॅम्स, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मोईन अली, ड्वेन ब्रावो, मुकेश चौधरी, महेश थीक्षाना आणि सिमरजीत सिंह.