रोटरी क्लब ऑफ़ जळगाव सेंट्रल तर्फे सामाजिक उपक्रमाअंतर्गत शनिवारी जिल्हा परिषदेच्या बेळी येथील शाळेत वॉटर पंप आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पाण्याची बॉटल आणि बूट यांच्यासह विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ़ जळगाव सेंट्रल तर्फे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. या उपक्रमा अंतर्गत देखील जळगाव तालुक्यातील बेळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाण्याची टाकी भरण्यासाठी वॉटर पंप भेट देण्यात आला. हा पंप बसवल्याने विद्यार्थ्यांना आरओ चे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. यावेळी रोटरी क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना एक लिटर पाण्याची बॉटल व बूट यांच्यासह विविध साहित्याचे वाटप केले.
रोटरी क्लब ऑफ़ जळगाव सेंट्रल च्या सदस्यांनी विविध साहित्यांचे वाटप केले त्यामध्ये.. टेक्समो वॉटर पंप संतोष अग्रवाल, महेंद्र गांधी, अजय जैन, कल्पेश दोशी, विपुल पारेख आणि डॉ अपर्णा भट यांनी वाटप केले. नोटबुकचे वाटप संतोष अग्रवाल, तर 40 – 1 लिटर वॉटर बॉटल महेंद्र गांधी, बूट जोडी : पंकज कासट, विनय सुरतवाला आणि महेंद्र गांधी यांनी वाटप केले.
ह्या कार्यक्रमास प्रेसिडेंट राजेश चौधरी,संतोष अग्रवाल, पंकज कासट, डॉ. अपर्णा भट, डॉ प्रीती पाटील आणि डॉ विद्या चौधरी तसेच शाळेचे शिक्षक वृंद अनिल महाजन, लोटन पवार, पालक चेतन नाले व खुशाल भंगाळे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या बेळी शाळेतर्फे क्लब चे सदर सर्व उपक्रमांसाठी आभार मानण्यात आले व सर्व विद्यार्थ्यी ही अत्यंत आनंदी होते. तसेच शाळा अजून कशी उत्तम होईल, ह्याबद्दल उपस्थित सर्वां बरोबर चर्चा ही झाली.