मुंबईत पार्किंगसाठी काही धोरण आहे का? हायकोर्टाचा शिंदे सरकारला सवाल

मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालली आहे. त्यातच लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी जागा मिळणे दूर झाले आहे. अशातच मुंबईच्या अरूंद रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी भविष्यातील सरकारची उपाय योजना संदर्भात मुंबई हायकोर्टाने सुद्धा राज्य सरकारकडे विचारणा केली आहे. चार आठवड्यांत राज्य सरकारला कोर्टासमोर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे.

मुंबईच्या वाहतूक कोडींबद्दल एका याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या द्विसदस्य खंडपीठाचा राज्य सरकारला निर्देश दिले आहे.

मुंबईतील अरुंद रस्त्यांची यादी तयार करून, तिथं वाहनं उभी करण्यासाठी जागा कशी उपलब्ध करता येईल? हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार आणि पालिकेनं एकत्रित धोरण आखण्याची न्यायालयाची सूचना आहे.

टिळक नगर येथील उद्यान गणेश रोड हा केवळ 20 फुटांचा रस्ता असून या रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या पार्किंग केल्या जातात. डिसेंबर 2018 मध्ये या भागात एका इमारतीला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलाचं वाहनंही घटनास्थळी पोहोचू न शकल्याने आगीत होरपळून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य सरकारनं पार्किंगचं धोरण निश्चित करावं आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत टिळक नगर नागरीक उत्कर्ष मडळानं एड. सविना क्रास्टो यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.