आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादीनेही (NCP) महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरु केलीये. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आजपासून चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असतील. ते चार दिवसात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करतील. यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. आता त्याच गडात राष्ट्रवादी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.
शरद पवार हे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचतील. त्यानंतर ते व्यापाऱ्यांसोबत बैठक, पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळं विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे. तसेच, याने पक्षालाही बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे.