इतिहासकार, नाटककार, साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसाधनेचा ध्यास घेत तोच वसा आयुष्यभर जपला. महाराष्ट्र नवा निर्माण सेनेनं पुरंदरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थीचं विसर्जन 11 किल्ल्यांवर करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.
पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शिवशाहिरांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी सकाळ पासूनच मनसेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी तसेच बाबासाहेब पुरंदरेप्रेमींनी गर्दी केली होती. यावेळी शिवशाहीर पुरंदरेंच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बाबासाहेंबाचा शिवशाही विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मनसे करणार असल्याची माहितीही पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
काल शिवशाहीर पुरंदरे यांच्या निधनाची माहिती मिळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल झाले. बाबासाहेबांच्या घरी दाखल होत त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली. याचबरोबरच राज ठाकरे यांनी आपलया अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करतही श्रद्धांजली अर्पण केली आहे. ”बाबासाहेबांनी आपले आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं , वर्तमानतील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं याबाबत कायम त्यांच्याकडून मार्गदर्शन होत आलं , माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच पण पितृतुल्यही होते.
बाबासाहेब मला नेहमी सांगता महाराजांचा जिथं जिथं पदस्पर्श झाला आहे तिथं तिथं मी अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे ती म्हणजे महाराज जिथं गेले तिथं जायची. शिवछत्रपतींचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवक करण्यासाठी निघाला, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.