बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खानला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. आमिर खान सध्या क्वारंटाइन आहे.
या संदर्भामध्ये त्याच्या प्रवक्त्याने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आमिर खानने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’वरील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मातोश्री निवासात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर आल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासोबत हजेरी लावणाऱ्या अभिनेता आमिर खानलाही कोरोना झाला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.