मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा उघड झाला आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करत ते भाजपमध्ये गेले. आता त्यांना सूक्ष्म, मध्यम आणि लघूद्योग खात्याचे मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे नारायण राणे यांचं डोकं पण सूक्ष्म झालंय, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.
नारायण राणे किती दिवस अस्वस्थ होते, हे आपण पाहिलंय. आता मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा उघड झाला आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करत ते भाजपमध्ये गेले. आता त्यांना सूक्ष्म, मध्यम आणि लघूद्योग खात्याचे मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे नारायण राणे यांचं डोकं पण सूक्ष्म झालंय, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.
एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असं विधान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. राणेंच्या या वक्तव्याचा खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला आहे. मला शिवसेनेत आणि मंत्री म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य आहे. राणेंच्या विधानात काही तथ्य नाही. हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. (फोटो गुगल)