आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली आहे. स्पर्धेतील 25 मीटर पिस्तूल प्रकारातील तिन्ही पदके भारताला मिळाली आहेत. भोपाळच्या चिंकी यादवने राही सरनोबत आणि मनू भाकेरला धक्का देत सुवर्णपदकावर नाव कोरले.
23 वर्षीय चिंकीच्या सुवर्णपदकामुळे भारताकडे आता एकूण 9 सुवर्णपदके झाली आहेत. नेमबाजीच्या या प्रकारात 19 वर्षीय राहीला रौप्य तर, मनू भाकेरला कांस्यपदक मिळाले आहे. या तिघांनीही आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता दर्शवली आहे. सकाळच्या सत्रात युवा नेमबाजपटू ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने 50 मीटर रायफल 3 पोजिशन इवेंट या प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. भोपाळच्या ऐश्वर्यने 462.5 शॉट्ससह प्रथम क्रमांक मिविला. हंगेरीच्या इस्वान पेनी दुसर्या आणि स्टीफन ऑल्सेनने कांस्यपदक जिंकले. संजीव राजपूत आणि नीरज कुमार या भारतीय नेमबाजपटुंना सहाव्या आणि आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ऐश्वर्य आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.