भारताचा मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ला कोरोना संसर्गाची लागण झालेली आहे. या संदर्भातील माहिती स्वतः सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटर हँडल वरून दिली आहे. आपण होम क्वारंटाइन असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे असं सचिनने म्हटलं आहे.
“करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होते. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. तसेच माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे,” असं सचिनने ट्विटमध्ये म्हटलं आहे.