कंगना ओटीटीच्या व्यासपीठावर पाऊल ठेवणार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती बेधडकपणे आपली मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. यामुळे ती बर्‍याच वेळा वादांचा भागही बनली आहे. बॉलिवूडमध्ये चमकदार कामगिरी दाखवल्यानंतर आता कंगना ओटीटीच्या व्यासपीठावर पाऊल ठेवणार आहे. तिच्या ओटीटी पदार्पणाविषयी जाणून कंगनाच्या चाहत्यांना खूप आनंद होणार आहे. कंगना एक रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे. त्यानंतर त्यांचे चाहते खूप आनंदित आहेत. शो टेंप्टेशन आयलँडच्या भारतीय व्हर्जनसह कंगना ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. माध्यम अहवालांनुसार कंगनाने हा शो साईन केला असून, लवकरच त्याचे चित्रीकरण सुरू होईल.

कपल आणि अविवाहित लोक टेम्प्टेशन आयलँड या शोमध्ये येतात, जिथे त्यांचे एकमेकांसोबातचे कनेक्शन, त्यांच्या जोडीदाराशी संबंधांची चाचणी केली जाते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंगनाच्या पदार्पणाविषयी जाणून तिच्या चाहत्यांना खूप आनंद होणार आहे. कंगनाच्या चाहत्यांनी तिचा अभिनय नेहमीच पाहिला आहे. आता ती आपले होस्टिंग टॅलेंट देखील दाखवणार आहे.

सध्या कंगना रनौत तिच्या आगामी चित्रपटाचे बुडापेस्टमध्ये शूटिंग करत आहे. नुकतेच तिने शूटिंगच्या ठिकाणाहून आपले फोटो शेअर केले. चित्रपटात कंगना एका एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे, जिचे नाव अग्नी असेल. या चित्रपटात कंगनाच्या सोबत अर्जुन रामपाल महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कंगना रनौतकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. तिचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. एप्रिल महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोना साथीच्या आजारामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय ती ‘धाकड’, ‘तेजस’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या पात्रासाठी कंगना बरीच तयारी करत आहे. नुकतेच तिने या लूकशी संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.