मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं 5 जानेवारीला 39 वा वाढदिवस साजरा केला. सध्या प्रार्थना झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठमध्ये नेहाची भूमिका साकारत आहेत. तिच्या सोबत या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे देखील दिसत आहे. प्रार्थनावर चाहत्यांकडून वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.
माझी तुझी रेशीमगाठमधील कलाकारांनी देखील प्रार्थनाचा वाढदिवस खास बनवत तिला काही गिफ्ट दिल्या आहेत. या सगळ्यांच्या गिफ्टचे फोटो व व्हिडिओ आज प्रार्थनाने इन्स्टावर शेअर केले आहेत. मालिकेत प्रार्थनाच्या मैत्रिणीची म्हणजे शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे साकारत आहे. तिनं काल प्रार्थनासाठी खास केक मागवत तिचा वाढदिवस साजरा केला. मालिकेत प्रार्थनाच्या मुलीची म्हणजे छोट्या परीची भूमिका साकारणाऱ्या मायराने देखील प्रार्थनाला खास गिफ्ट दिल आहे. याचा व्हिडिओ देखील प्रार्थनाने शेअर केला आहे.
या सगळ्यात वेगळ्या स्टाईलने कुणी प्रार्थनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असतील तर त्या यशने म्हणजे श्रेयस तळपदे यानं. प्रार्थनाने ज्याप्रमाणे श्रेयसने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी श्रेयस तळपदे शुभेच्छा देताना म्हणतो वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहा कामत उर्फ परीची आई. यावेळी मात्र प्रार्थनाच्या चेहऱ्यावरचे हवभाव काहीसे पाहण्यासारखे होते. प्रार्थना श्रेयसकडे रागाने म्हणजे डोळे मोठे करून पाहाताना दिसली. ..मात्र हे सगळ तो गमतीनं करताना दिसला.
सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. विशेष म्हणजे नेहाला यशचं सत्य समजलं आहे. यानंतर तिनं राजीनामा देखील दिला आहे. यशनं तो स्वीकरला देखील आहे. आता नेहाचं मन जिंकण्यासाठी यश काय करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवाय प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली आहे की, नेहाला यशचं खरं प्रेम कळेल का ? आता येणाऱ्या भागात याचा उलगडा होईल.