राज्यात करोनाचा धोका दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण आधीच्या लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत तीनपटीने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र पोलिसातील अनेकांना बाधा झाली होती. आतादेखील धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्यात मुंबई पोलिसांना कोरोनाची सर्वाधिक लागन झाली आहे. तर हिंगोलीत सर्वात कमी पोलिसांना करोनाची लागन झाली आहे. राज्यात आतापर्यंत 46 हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागन झाली आहे. यापैकी 500 पोलिसांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यात सध्या 8 हजार 836 पोलीस क्वारंटाईन आहेत.
कोरोनाची तिसरी लाट सगळ्यांनाच आपल्या विळख्यात घेत आहे. यातून आपल्या कार्यावर सदैव तत्पर असणारे पोलीसदेखील बचावले नाहीयत. राज्यातील पोलिसांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. राज्यात इतर पोलीस दलाच्या तुलनेत मुंबईतील मुंबई पोलीस सर्वात जास्त करोनाबाधित आढळले आहेत. राज्यात मुंबई पोलीस सर्वात मोठे पोलीस दल आहे. राज्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या मुंबईत आहे. त्यामुळेच राज्यात सर्वात जास्त कोरोनानाची लागण इतर पोलीस दलाच्या तुलनेत मुंबई पोलिसांना झालीय, असा विचार तुम्ही करत असाल. पण हे साफ चुकीचे आहे. कारण बेजबाबदार मुंबईकर याला जबाबदार आहेत. वारंवार सांगून देखील मुंबईकर करोना नियमांचे पालन करत नाहीयत. ज्याचा परिणाम मुंबई पोलिसांना भोगावा लागतोय.
आठवड्याभरात तब्बल 155 पोलिसांना कोरोना
प्रत्येक वेळेस कायदा-सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस पुढे असतात. पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे. कारण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा या तिसऱ्या लाटेत पोलिसांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तिसऱ्या लाटेत अवघ्या आठवड्याभरात तब्बल 155 पोलिसांना करोनाची लागण झालीय. ज्यात 45 पोलीस असे आहेत ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत. पण एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना करोना होवून गेला आणि ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेत अशा एकाही पोलिसांला करोनाची लागन झाली नाहीय.
राज्यात सध्या 8 हजार 836 पोलीस क्वारंटाईन
मुंबईत आतापर्यंत एकूण 46 हजार 878 पोलिसांना करोनाची लागण झालीय. यापैकी 5 हजार 843 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 41 हजार 35 पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालीय. तर 5 हजार 643 पोलिस अधिकाऱ्यांनी करोनावर मात केली आहे. 40 हजार 163 पोलीस कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केलीय. म्हणजेच राज्यात एकूण 45 हजार 806 पोलिसांनी करोनावर मात केलीय. दुःखदायक म्हणजे राज्यात आतापर्यंत करोनामुळे तब्बल 44 पोलीस अधिकाऱ्यांचा आणि 456 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय. तर राज्यात सध्या 8 हजार 836 पोलीस क्वारंटाईन आहेत.