जळगाव : निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित असल्याने त्यांच्या पूर्ततेसाठी जळगाव मध्ये 24 फेब्रुवारी रोजी अर्ध नग्न उपोषण केले जाणार आहे.
यासंदर्भातील माहितीपत्रक दशरथ निकम यांनी प्रसिद्धीला दिले आहे. या पत्रकात म्हटले आहे की , गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम 15 नुसार सर्व तेरा सवंर्ग कर्मचार्यांचे पदनामांतर करुन समकक्ष स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर दिनांक 01/01/1989 रोजी समाविष्ट करणे व नियम 40 नुसार वेतन निश्चित करणे.
दिनांक 01/10/1994 रोजी कालबध्द पदोन्नती अंतर्गत पहिला लाभ पदोन्नती साखळीतील वरिष्ठ श्रेणीचा लाभ वित्त विभाग शासन शुध्दीपत्रक दिनांक 01/02/2020 नुसार अनुज्ञेय करावा. तर 01/10/2006 रोजी अश्वासित प्रगती योजने अंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ अनुज्ञेय करावा.
वित्त विभाग शुध्दीपत्रक क्रमांक वेतन 1110/प्र.क्र.8/2010/सेवा-3 नुसार दिनांक 01/10/2006 ते 31/03/2010 या कालावधीत देण्यात आलेल्या काल्पनीक वेतन वाढीचा फरक रोखीने अदा करावा.
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचे समावेशन व त्यांना प्रदान करण्यात येणार्या लाभा संदर्भात प्रचलित शासन निर्णयामधील तरतुदी तपासुन कृती समितीस अवगत करावे असे आदेश सा.बा. विभाग मंत्रालय मुंबई-32 यांचे शासन पत्र क्रमांक संकीर्ण 2022/प्र.क्र.422/सेवा 3 दि. 24/11/2022 चे पत्रात संबंधितांना दिलेले आहे. तरीही अद्यापपावेतो कर्मचार्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय कार्यवाहीचा निषेध करण्यासाठी सदर मुक उपोषण करीत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समिती सा.बा. प्रादेशिक विभाग मुंबई श्री. शिवाजी लक्ष्मण देशमुख यांच्या सुचनेनुसार व त्यांनी केलेल्या मा. राज्यपाल महोदय / मुख्य सचिव / अप्पर सचिव / सचिव (इमारती) सा.बा. विभाग मंत्रालय, मुंबई-32 / सा.बा. प्रादेशिक विभाग व सा.बा. परिमंडळ मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद / राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन व इतर संबंधित अधिकारी यांना केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने मागण्या मान्य करण्याकरीता सा.बां. मंडळ, जळगाव येथुन निवृत्त कर्मचारी वय वर्ष 60 ते 85 वयोगटातील पुरुष कर्मचारी अर्धनग्न मुक उपोषण करण्यासाठी सा. बा. मंडळ जळगाव कार्यालया जवळ, जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि. 24/02/2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत करणार असल्याचे निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कृती समितीचे
सचिव दशरथ निकम यांनी कळवले आहे.