…म्हणून सरकार कोसळलं, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ चुकीवर कोर्टाने ठेवलं बोट
राज्यातील सत्तासंघर्षावर मागील 4 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सलग सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीही निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ही त्यांची चूक असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवले आहे. जर, बहुमत चाचणीला सामोर गेला असता तर आम्ही ती चाचणी रद्द ठरवली असती, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.
आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या 5 जणांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. आजच्या सुनावणीमध्ये बहुमत चाचणी, राज्यपालांची भूमिका, शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी का गेले, यावर जोरदार युक्तिवाद झाला.
काँग्रेस नेते पवन खेरांना दिल्ली विमानतळावरून आसाम पोलिसांनी केली अटक
आसाम पोलिसांनी काँग्रेस नेते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. त्यांना दिल्ली न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यानंतर आसामला नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तत्पूर्वी पवन खेरा हे पक्षाच्या अन्य सहकाऱ्यांसमवेत काँग्रेस अधिवेशनासाठी दिल्लीहून रायपूरला निघालेले असताना, त्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून उतरवलं होतं.त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करून अंतरिम जामिनावर सोडण्याची निर्देश दिले आहेत. तसेच जोपर्यंत पवन खेरा नियमित जामीनासाठी अर्ज करत नाहीत, तोपर्यंत त्यांना अटक करू नये, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे खेरा यांना मंगळवारपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.
दुडुदुडू धावणाऱ्या कासवांच्या पाठीवर उपग्रह; समुद्रातील भ्रमणमार्ग शोधण्याचा प्रयत्न
गुहागरच्या किनाऱ्यावर आणखी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना बुधवारी उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
मागील वर्षी पाच ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. मात्र, ते उपग्रह टॅग खराब निघाल्याने प्रकल्प अर्ध्यावरच राहिला.
वनखात्याच्या कांदळवन कक्षाने ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मागील वर्षी पाच कासवांना उपग्रह टॅग करण्यात आले. त्यापैकी चार कासवांचा संपर्क तुटला होता. ज्या कंपनीकडून हे उपग्रह टॅगिंग खरेदी करण्यात आले, त्या कंपनीने दिलेल्या मुदतीच्या आतच ते खराब झाले. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. कंपनीने अतिरिक्त पैसे न घेता नवीन उपग्रह टॅग दिले. त्यामुळे यावर्षी पुन्हा नव्याने या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे.
भारतातील रस्त्यावर धावणार हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस
पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानुसार पर्यावरणपूरक आणि परकीय चलन वाचवणाऱ्या इंधनाच्या संशोधनात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. बॅटरी किंवा विद्युत घटांवर चालणाऱ्या बस गाड्या आता सर्वच महापालिका क्षेत्रात दिसू लागल्या आहेत.
यानंतर आता थेट हायड्रोजनवर चालणाऱ्या आणि धूराऐवजी पाण्याचे उत्सर्जन करणाऱ्या बसेस लवकरच सार्वजनिक वाहतुकीत मोठी क्रांती घडवणार आहेत. महत्वाचे म्हणजे यामुळे देशाचे हायड्रोकार्बन म्हणजेच कार्बन इंधन आयात करण्यासाठी लागणारे बहुमुल्य परकीय चलन वाचणार आहे.
IND VS AUS : फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारतासमोर 173 धावांच आव्हान
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज सेमीफायनाचा पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढय संघांमध्ये फायनल गाठण्यासाठी लढत सुरु असुन यापैकी कोणता संघ हा सामना जिंकून थेट फायनलमध्ये प्रवेश करेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
ऑस्ट्रेलियाने सेमी फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर भारताला गोलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. आता ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 172 धावा करून भारताला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले आहे. भारत हे आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरला तर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला नमवून फायनलमध्ये प्रवेश करेल.
अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! MPSC चा मोठा निर्णय
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी अनेकदा आंदोलनही करण्यात आले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या मुख्य परीक्षांसाठी वर्णात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यूपीएससीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी केली होती. याबाबत आता राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे, असे एमपीएससीने म्हटले आहे.
‘उद्धव VS शिंदे’नंतर राष्ट्रवादी पुन्हा आशावादी?
आधी जयंत पाटील मग अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे. राष्ट्रवादीच्या या नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी सुरू आहे. मागच्या काही दिवसांमध्ये मुंबईत हे पोस्टर लावण्यात आले. मुख्य म्हणजे जयंत पाटील यांच्या पोस्टरवर कार्यकर्त्यांचे फोटो होते, पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणाऱ्या पोस्टर्सवर कार्यकर्त्यांची नावही नव्हती.
उत्साही कार्यकर्त्यांनी असे पोस्टर लावले असतील, पण जोपर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत कोणीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं अजित पवार म्हणाले. तर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पोस्टरवरून संताप व्यक्त केला. जर असं पोस्टर कोणी लावलं असेत आणि त्याच्यावर कोणी लावलं त्याचं नाव नसेल तर, मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी न्याय मिळून द्यावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
करोनानंतर प. बंगालमध्ये ‘ॲडिनोव्हायनस’ने घातले थैमान
२०१९-२० मध्ये करोना महामारीला सुरुवात झाली. जगभरामध्ये पसरलेल्या या रोगाने लाखो लोकांचा बळी घेतला. पहिल्या लाटेनंतर करोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट उदयास आला. एकूण परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारद्वारे टाळेबंदी करण्यात आली. पुढे प्रकरण स्थिर झाल्यानंतर हळूहळू सर्वकाही सुरु करण्यात आले. करोनाचे संकट असतानाच एका नव्या विषाणूमुळे एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल राज्यामध्ये ॲडिनोव्हायरस विषाणूने पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला आहे.
SD Social Media
9850 60 3590