अफगाणिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तानात आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. समोर आलेल्या माहितीप्रमाणे 18 मिनिटांमध्ये अफगाणिस्तान दोनदा हादरले. पहिल्यावेळी जो भूकंप झाला त्याची तीव्रता 6.7 रिस्टर स्केल इतकी होती. तर दुसरा भूकंप कमी तीव्रतेचा असून, त्यांची नोंद 5 रिस्टर स्केल इतकी झाली आहे. भूकंपामुळे गोंधळ उडाला असून, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावणर आहे.
6.7 रिस्टर स्केलची नोंद
समोर आलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानात आज पहाटेच्या सुमारास 18 मिनिटांत दोनदा भूकंप झाला. सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी आणि त्यानंतर 6 वाजून 25 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जावणले. पहिल्यावेळी जो भूकंप झाला त्याची तीव्रता 6.7 रिस्टर स्केल इतकी होती. तर दुसरा भूकंप कमी तीव्रतेचा असून, त्यांची नोंद 5 रिस्टर स्केल इतकी झाली आहे. अफगाणिस्तानच्या फैजाबादमध्ये हा भूकंप झाला आहे. पहिल्या धक्क्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 113 किमी आणि दुसऱ्या धक्क्याचा केंद्रबिंदू 150 किमी खोल होता.
ताजिकिस्तानमध्येही भूकंप
दरम्यान अफगाणिस्तानप्रमाणेच ताजिकिस्तानमध्येही भूकंप झाला आहे. ताजिकिस्तानमधील मुर्गोबपासून 67 किलोमिटर पश्चिमेला भूकंप झाला असून, या भूकंपाची तिव्रता 6.8 रिश्टर स्केल एवढी होती. याबाबत चिनी प्रसारमाध्यमांकडून माहिती देण्यात आली आहे. चीनच्या झिंजियांग आणि ताजिकिस्तानच्या सीमावर्ती भागात भूकंप झाल्याचे चिनी प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.