देशातील पहिलं ड्रोन स्कूल मार्च महिन्यापासून सुरू होणार

ड्रोन उडवण्यासाठी परवानगी लागते. मात्र चक्क देशात ड्रोन स्कूल तयार करण्यात आली आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे आणि कोणत्या राज्यात सुरू झाली आहे त्याबद्दल जाणून घेऊया. ड्रोन स्कूल म्हटलं की उत्सुकता अधिक वाढते.

देशातील पहिलं ड्रोन स्कूल मार्च महिन्यापासून सुरू होत आहे. MITS कॉलेजमध्ये ड्रोन स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अॅकॅडमीने यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एमआयटीएस कॉलेजसोबत करार करण्यात आला आहे.

देशातील पहिल्या ड्रोन स्कूलमध्ये 3 महिने ते एक वर्षांपर्यंतचे अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत. 11 डिसेंबर रोजी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यात 5 ड्रोन शाळा सुरू करण्याची घोषणा केली.

मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाल, जबलपूर, ग्वालियर आणि सतना इथे ड्रोन स्कूल सुरू करण्यात येणार आहेत. ड्रोन स्कूलमध्ये 3 महिने ते एक वर्षाचा ड्रोन पायलट कोर्स असेल. किमान 12 वी पास तरुणांना ड्रोन स्कूलमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
ड्रोन स्कूलसाठी प्रशिक्षण आणि ड्रोन उडवण्याची मार्गदर्शक तत्व तयार करण्यात आली आहेत. फेब्रुवारी महिन्यात इंदिरा गांधी नॅशनल ड्रोन अकादमी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रवेश आणि नियमांचा संपूर्ण उल्लेख करण्यात येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.