एवढी संपत्ती कुठून आली? 75व्या वाढदिवशी पवार-ठाकरेंसमोरच भुजबळांनी सांगून टाकलं!
छगन भुजबळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात हे दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलावलं होतं, पण ते आले नाहीत, अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात भुजबळांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवरही उत्तर दिलं.
लोक म्हणतात एवढी संपत्ती कशी, पण आम्ही दोन भावांनी खूप मेहनत घेतली. सकाळी 3 वाजता भाजी घ्यायला मार्केटमध्ये जायचो. ती भाजी माझगावच्या घरासमोरच्या फुटपाथवर विकायची. नंतर मोठ्या कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट घेतली आणि ट्रकभर भाजी पाठवायचो. लोक एवढी संपत्ती कुठून आली विचारतात, पण आम्ही लहानपणापासून मेहनत घेतली, असं भुजबळ म्हणाले.
राज्याचे पणन विभागाचे सहसंचालक अचानक बेपत्ता, पुणे आणि साताऱ्यात खळबळ
सातारा जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र प्रशासनातील एक बडा अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या अधिकाऱ्याचा शोध घेतला असता हा अधिकारी नीरा नदीच्या पुलावरुन पायी जात असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. संबंधित अधिकारी हे राज्याच्या पणन विभागाचे सहसंचालक आहेत. शशिकांत घोरपडे असं त्यांचं नाव आहे. शशिकांत हे मूळचे साताऱ्याचे आहेत. पण ते सध्या पुण्यातील कार्यालयात कार्यरत आहेत. ते बुधवारी दुपारी पुण्याहून साताऱ्याच्या मार्गाला निघाले होते. पण ते साताऱ्याच्या त्यांच्या घरी पोहोचलेच नसल्याची माहिती समोर आली. त्यांच्या कुटुंबियांनी बराच वेळ झाला तरी शशिकांत घरी आले नाही म्हणून पोलिसात तक्रार केली त्यानंतर पोलिसांच्या तपासाचे चक्र फिरले. पण शशिकांत घोरपडे हे अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी नीरा नदीच्या पात्रात बचाव पथक दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं आहे. शशिकांत यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
वर्ल्ड कपसाठी जाणारे टीम इंडियाचे दोन खेळाडू भारतातच अडकले
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मिशन टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियानं आपली मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. दोन सराव सामनेही टीम इंडियानं खेळले. पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ अखेरची मॅच प्रॅक्टिस करणार आहे. पण त्याआधी भारतीय संघासमोर एक मोठी अडचण उभी राहिली आहे. वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयनं दोन खेळाडूंना नेट बॉलर म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पण टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली तरी हे दोन खेळाडू मात्र अजूनही भारतातच अडकून आहेत.आयपीएल स्टार उमरान मलिक आणि मध्य प्रदेशचा युवा खेळाडू कुलदीप सेन हे नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार होते. भारतीय संघाला मदत व्हावी म्हणून या दोघांनाही नेट बॉलर म्हणून पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला होता. पण अद्याप ऑस्ट्रेलियन व्हिसा न मिळाल्यानं दोघेही अजून भारतातच अडकले आहे.
भारतीय हवाई दलाकडून नव्या अग्निवीर वायू भरतीबाबत घोषणा
भारतीय हवाई दलानं नवीन अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी तारखा घोषित केल्या आहेत. नवीन भरती प्रक्रियेसाठीची नोंदणी प्रक्रिया नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. या भरतीसाठी जानेवारी 2023 मध्ये परीक्षेचं आयोजन केलं जाईल, अशी माहिती हवाई दलानं ट्विटद्वारे दिली आहे. हवाई दलानं 12 ऑक्टोबरला यासंबंधीची आधिकृत माहिती त्यांच्या ट्विटर हॅंडलवरून दिली. त्यात म्हटलं आहे की, या भरती प्रक्रियेसंदर्भात लवकरच संपूर्ण नोटिफिकेशन agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलं जाईल. तथापि, हवाई दलाकडून अग्निवीर वायू 2022 ची भरती करण्यात आली आहे. आता 2023 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठीची नोंदणी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होईल.
पाकिस्तानात बसला भीषण आग; १८ पूरग्रस्तांचा मृत्यू, अनेक जण जखमी
पाकिस्तानमध्ये बसला लागलेल्या भीषण आगीत १८ पूरग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नऊ महिला आणि आठ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त कुटुंब दक्षिणेतील कराचीतून मूळगावी खैरपूर नाथन शाहमध्ये जात असताना ही घटना घडली, अशी माहिती पोलीस अधिकारी हाशिम ब्रोही यांनी दिली आहे. पुराचा तडाखा बसल्याने पाकिस्तानातील हजारो नागरिकांनी कराचीत आश्रय घेतला आहे. या ठिकाणाहून परतत असताना पीडित कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
पोलिसांच्या शूटआऊटमध्ये भाजपा नेत्याची पत्नी ठार, गावकऱ्यांनी पोलिसांनाच ठेवलं ओलीस
उत्तराखंडमध्ये खाण माफियाचा पाठलाग करताना पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, एका महिलेचा मृत्यू झाला. पोलीस आणि माफियांमध्ये झालेल्या गोळीबारात या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या भाजपा नेते गुरताज भुल्लर यांच्या पत्नी गुरप्रीत कौर होत्या. गुरताज भुल्लर हे ब्लॉक अध्यक्ष आहेत. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड रोष असून वाद पेटला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असून, दोन पोलीस कर्मचारी बेपत्ता आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचंही ठरलं, कोण देणार लटकेंना टक्कर?
उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा उद्या सकाळी 11 पर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल या चिन्हासह शिवसेनेने दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
दरम्यान बाळासाहेबांच्या शिवसेनेतून कोणाचं नाव दिलं जाणार याबाबत चर्चा सुरू असताना महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुरजी पटेल उदया भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईहून ठाण्याकडे जाणारा मार्ग 4 दिवस राहणार बंद, या रस्त्यांवरून करू नका प्रवास!
ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नल ते हायपरसिटी मॉल, वाघबीळ ब्रिज, घोडबंदर रोड या ठिकाणी आज १३ ते १६ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविली आहे.
SD Social Media
9850 60 3590