गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू झालेली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अखेर आज महाराष्ट्रात दाखल दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता नांदेडच्या देगलूरमध्ये भारत जोडो यात्रेचं आगमन होईल. त्यानंतर पुढील 14 दिवस ही यात्रा राज्यात ठिकठिकाणी जाणार आहे.
आज रात्री राहुल गांधी देगलूर ते वन्नाळी अशी मशाल यात्रा करणार आहेत. हे नऊ किमीचं अंतर असेल तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल. याठिकाणी राहुल गांधींचं भाषण होईल. भारत जोडो यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून करण्यात आली. महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस पक्ष पातळीवर यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन, यात्रा सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी वातावरण तयार करण्यात आलंय.
या यात्रेसाठी महाविकास आघाडीच्या पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहे. तर शिवसेनेकडून अद्याप कोण या यात्रेत सहभागी होणार हे अद्याप ठरलेलं नाही.