टाटा मोटर्स ठरली भारतामधील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी

टाटा मोटर्स ही भारतामधील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी बनली आहे. टाटा मोटर्सने वाहन विक्रीमध्ये हुंडाईला मागे टाकले आहे. गेल्या महिन्यात टाटाच्या 35,300 वाहनांची विक्री झाली, तर त्याच कालावधीमध्ये हुंडाईच्या एकूण 32,312 वाहनांची विक्री झाली आहे. टाटा मोटर्सच्या वाहनांची विक्री वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे टाटाची एसयूवी नेक्सऑन ही कार आहे. टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तब्बल 99,002 वाहनांची विक्री केली. विक्रीच्या बाबतीमध्ये टाटाने सर्व वाहन निर्मिती कंपन्यांना मागे टाकले आहे.

कंपनीने 2021 वर्षामध्ये 3.31 लाख वाहनांची विक्री केली, वार्षिक आधारावर कोणत्याही वाहन निर्मिती कंपनीच्या विक्रीपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. मागील वर्षी कंपनीच्या विक्रीमध्ये तब्बल 50 पटीने वाढ झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये टाटा मोर्टर्सने 23,545 वाहनांची विक्री केली होती. 2020 च्या तुलनेमध्ये गाड्यांच्या विक्रीमध्ये 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. या बाबत कंपनीकडून नुकतीच आकडेवारी जाहीर करण्यात आली.

दरम्यान दुसरीकडे टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांना देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. कंपनीने मागील वर्षी 2021 मध्ये 2,215 वाहनांची विक्री केली होती. तर 2020 मध्ये 418 वाहनांची विक्री केली होती. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात इलेक्ट्रिक वाहनाच्या विक्रीमध्ये तब्बल 439 पटींची वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या तिमाहीमध्ये 5,592 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. तसेच सेमीकंडक्टरचा पुरवठा देखील मंदावला होता. याचा परिणाम हा कार निर्मिती आणि विक्रीवर झाला. मात्र आता वातावरण हळूहळू सामान्य होत असून, पुढील काळात कार विक्रीमध्ये आणखी वाढ होऊ शकते अशी अपेक्षा कंपनीला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.