गेल्या 6 दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय खलबलांना पूर्णविराम लागत नसल्याचं दिसून येत आहे. एक पक्ष सत्ता स्थापनेसाठी तर दुसरा पक्ष सत्ता वाचविण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत आहे.
दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मध्यरात्री बंडखोर एकनाथ शिंदे यांची बडोद्यात भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे त्यावेळी अमित शाहदेखील बडोद्यात असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे गुवाहाटीने बडोद्याला रवाना झाले होते. अमित शहा आणि फडणवीसांची भेट घेऊन शनिवारी सकाळी 6.45 ला ते गुवाहाटीला परतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून काल सकाळपर्यंत गृहमंत्री अमित शाह बडोद्यात होते. ते सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. मात्र त्यांनी शिंदे आणि फडणवीसांसोबत भेट झाली की, नाही हे सांगणं अवघड आहे.
देवेंद्र फडणवीस इंदूरहून बडोद्याला रवाना…
शुक्रवारी रात्री देवेंद्र फडणवीस हे इंदूरमार्गे बडोद्याला रवाना झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हेदेखील गुवाहाटीवरुन बडोद्याल्या गेल्याचं समोर आलं आहे. येथे त्यांची भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी पुढील प्लान रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या भेटीबाबत कोणतीही पुष्टी मिळाली नसली तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच कारणासाठी दोघे बडोद्याला जाण्याची शक्यता दाट आहे.
पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांबद्दलची गुप्त माहिती समोर आली आहे. परतीच्यावेळेसही ते आधी इंदूरला आले आणि येथून मुंबईल परतले. महाराष्ट्रातील एअरपोर्ट शिवसेनेच्या ताब्यात असल्या कारणाने फडणवीसांनी आपली यात्रा गोपनीय ठेवली आणि इंदूरला येऊन गुजरातला गेले. त्यांच्या या प्रवासादरम्यान दोन्हीही वेळेस कोणी विमानातून उतरलं नाही आणि चढलंदेखील नाही. विमानात केवळ इंधन भरण्यात आलं.
मुंबईपासून वडोदरा अवघ्या 400 किलोमीटरवर आहे. आणि मुंबईहून इंदूर 600 किलोमीरट. अशात मुंबईहून थेट वडोदरा जाण्याऐवजी फडणवीस इंदूरच्या मार्गाने येथे का गेले? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आपली गुजरात दौरा लपवण्यासाठी ते व्हाया इंदूरहून गेले.