टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ता लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये बबीता जीची भूमिका साकारताना दिसते. या व्यक्तिरेखेत मुनमुनला खूप लोकप्रियता मिळाली आहे. आणि ती तिच्या खऱ्या नावापेक्षा तिच्या भूमिकेतील नाव बबीताजीच्या नावाने अधिक ओळखली जाते. शोमध्ये मुनमुन काही काळ दिसली नव्हती आणि यामुळे अनेक कयास सुरू झाले आहेत.
खरं तर याआधी कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमुळे महाराष्ट्रात लॉकडाउन लादण्यात आलं होतं, त्यानंतर या कार्यक्रमाचे शूटिंग मुंबईऐवजी दमण येथे हलविण्यात आलं. यानंतर, कोरोनाच्या केसेस कमी झाल्या तेव्हा महाराष्ट्रात लॉकडाउन उठविण्यात आलं आणि शूटिंग पुन्हा मुंबईत सुरू झालं.
गेल्या एक महिन्यापासून मुंबईत शूट चालू आहे पण या कार्यक्रमाच्या शूटिंगमधून मुनमुन गायब आहे. ती एकदासुद्धा सेटवर पोहोचली नाही. तिची अनुपस्थिती लक्षात घेऊन कथानकही लिहिलं जात आहे. अशा परिस्थितीत मुनमुनने शो सोडला असल्याचं दिसत आहे.
मात्र मुनमुनने अद्याप तरी शो सोडत असल्याची पुष्टी केलली नाही. मात्र, यूट्यूब व्हिडिओमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केल्यामुळे मुनमुन यापूर्वी बर्याच वादात आली होती. या वादामुळे तिला जेलमध्ये देखील जाव लांगलं होतं. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु नंतर कोर्टाने तिच्याविरोधात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरला स्थगिती दिली होती आणि तिला दिलासा मिळाला होता. मुनमुन खूप मानसिक अस्वस्थ झाली होती आणि तेव्हापासून ती शूटवर येत नव्हती.