ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेक बच्चनसोबत मुकेश अंबानी यांच्या एका फॅमिली फक्शनला हजेरी लावली होती. मुकेश अंबानी यांची बहिण नीना कोठारी यांच्या मुलीच्या प्री-वेडींग पार्टीला ऐश्वर्या आणि अभिषेक जोडीने पोहोचले होते. नीना कोठारी यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार हजर होते.
ऐश्वर्याने यावेळी लाल रंगाचा ओवर साईज ड्रेस घातला होता. फोटो काढण्यासाठी कॅमेरासमोर येताच तिने हातावर घेतलेल्या दुपट्याने आपलं बेबी बंब लपवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. मीडियापासून आपल्या प्रेग्नेंसीची बातमी लपवण्यासाठी ऐश्वर्याने लाल रंगाचा ओवर साईज ड्रेस या पार्टीला घातल्याचं दिसून आलं.
पण ऐश्वर्याचं वाढलेलं वजन पाहता बच्चन कुटुंबात चिमुकल्याचं लवकरच आगमन होणार असल्याची चर्चा सुरु झाली. ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.
ऐश्वर्याच्या स्टाईलिंगबद्दल सांगायचं झालं , तर ऐश्वर्याने परिधान केलेला हा लाल रंगाचा ड्रेस सब्यसाची यांच्या लेटेस्ट कलेक्शनपैकी एक आहे. सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो व्हायरल होताच ऐश्वर्या लवकरच गुड न्यूज देणार असल्याचं समजतंय.