सिकंदर शेख – महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा उडणार कुस्तीचा धुरळा
महाराष्ट्रच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी “महाराष्ट्र केसरी” ही कुस्ती स्पर्धा काही दिवसांपूर्वीच पार पडली. या स्पर्धेत पुण्याचा शिवराज राक्षे हा विजेता ठरला असून त्याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्याचा मान मिळवला. परंतु यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा सध्या वादात अडकली आहे. मातीतली कुस्तीच्या अंतिम सामन्यात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीत सिकंदरवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.मातीतीली कुस्तीच्या अंतिम सामन्यातील स्पर्धक सिकंदर शेखवर याने देखील आपल्यावर पंचांकडून अन्याय झाल्याचे म्हंटले आहे. महाराष्ट्र्र केसरीच्या माती गटातील शेवटच्या सामन्यात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. या सामन्यात महेंद्र गायकवाड याला पंचांनी जादा गुण दिल्याचा आरोप केला जात आहे. या सामन्यात महेंद्र याने मारलेला टांग डाव बसला नसताना चार गुण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र केसरीच्या पंचांकडून सिकंदरवर कोणताही अन्याय केला नसल्याची कबुली देण्यात आली आहे. सध्या हा वाद कुस्ती विश्वात चर्चेचा विषय ठरला असून या वादाचा शेवट आता सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील कुस्तीच्या सामन्याने होण्याची शक्यता आहे.
षटकारची हॅट्ट्रिक अन् शुभमन गिलने झळकावले द्विशतक
भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुबमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत २०८ धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ धावाांचा डोंगर उभारला.शुबमन गिलने १४९ चेंडूचा सामना करताना आपल्या खेळीत १९ चौकार आणि ९ षटकार लगावले. त्याचबरोबर तो भारताकडून वनडेत द्विशतक झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडे
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणातील एका आरोपीच्या जामीन अर्जास विरोध न करण्यासाठी एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा जळगाव पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.याबाबत सूरज सुनील झंवर (वय ३२, रा. साई बंगला, सुहास काॅलनी, जळगाव) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी ॲड. प्रवीण पंडीत चव्हाण (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोदीबाग, शिवाजीनगर), शेखर मधुकर सोनाळकर (रा. नयनतारा अपार्टमेंट, जळगाव), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दावोसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार
दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेतून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. या दौऱ्याबाबात मी आनंदी आणि समाधानी आहे. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून ते प्रत्यक्षात उतरतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरेंना परळी न्यायालयाचा ५०० रुपये दंड, १५ वर्षांपूर्वीच्या खटल्यात अटक वॉरंट रद्द!
चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसे कार्यकर्तांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. त्यानुसार आज राज ठाकरे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, याप्रकरणी आता न्यायालयाने त्यांचाविरोधातील अटक वॉरंट रद्द केला असून त्यांना ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या दणक्यानंतर तमिळनाडूच्या राज्यपालांची माघार
‘राज्यपाल रवी परत जा’ असे चेन्नईत जागोजागी लागलेले फलक, राज्यपालांना परत बोलवा म्हणून राष्ट्रपतींकडे तक्रार, विधानसभेत अभिभाषणात काही उतारे वगळल्यावर राज्यपालांनी वाचलेले नव्हे, तर सभागृहात वितरित केलेले भाषण अधिकृत समजावे म्हणून मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मांडलेला ठराव या साऱ्या घडामोडींमुळे राज्यपाल विरुद्ध द्रमुक सरकार यांच्यातील वादात राज्यपाल रवी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.
किंडरगार्टन जवळ हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, १६ जणांचा मृत्यू
युक्रेनची राजधानी कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये युक्रेनचे एक मंत्री, दोन लहान मुलांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. युक्रेन पोलिसांचे प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी सांगितलं की सध्या १६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. या १६ जणांमध्ये एक मंत्री, दोन लहान मुलं आणि सरकारमध्ये काम करणारे काही वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. डेनिस मोनास्टिसर्स्की असं मृत्यू झालेल्या मंत्र्यांचं नाव आहे असंही इगोर यांनी सांगितलं.
“चीनने वर्धक मात्रा म्हणून ‘कोवोवॅक्स’ला मान्यता द्यावी”, सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांचं मत
मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून ही जगभरातील देशांसाठी चिंतेची बाब आहे, असं मत सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे. तसेच या संकटावर मात करण्यासाठी आम्ही चीनला लसींचा पुरवठा करण्याबाबत विचार करत असल्याचेही ते म्हणाले. एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी संदर्भात प्रतिक्रिया दिली.
पालिकांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारीत सुनावणी
मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकांवर आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील महिन्यात निवडणुकांना हिरवा कंदील दाखविला, तर एप्रिल-मे मध्ये त्या होऊ शकतील. अन्यथा पावसाळ्यामुळे त्या आणखी लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत.
रोहित शर्माचा फेव्हरेट मोहम्मद सिराजचे आयसीसी क्रमवारीत प्रमोशन, विराट टॉप-४ मध्ये
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने नुकतीच नवी क्रमवारी जाहीर केली. खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमवारीत अनेक खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे प्रमोशन झाल्याचे दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या वन डे मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला मिळाले. मालिकेत सर्वाधिक बळी मिळवणारा सिराज या नव्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आला आहे.श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन शतकांसह २८३ धावा करणाऱ्या विराट कोहलीने ताज्या आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत चार स्थानांची प्रगती केली आहे. आठव्या स्थानावरून तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गोलंदाजी क्रमवारीत मोहम्मद सिराजला १५ स्थानांचा फायदा झाला आहे. गोलंदाजी क्रमवारीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
SD Social Media
9850 60 3590