बिहारमधील वाल्मिकी टायगर रिझर्व्ह पार्कमध्ये एका आठ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचा अंदाज बांधला जात होता. दरम्यान, वाघाच्या बछड्याच्या मुत्यृमागचे नेमके कारण आता समोर आले आहे. एका नेपाळी वाघिणीसोबत मेटिंग (समागम) दरम्यान हा बछडा अडचण ठरत असल्यामुळे भारतीय वाघानेच त्याचा फडशा पाडला आहे. तशी माहिती वनसंरक्षक हेमकांत राय यांनी दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी वाघीण आणि भारतीय वाघ यांच्यात मेटिंग होत होतं. या मेटिंगदरम्यान आठ महिन्याचा एक मादा बछडा बाधा ठरत होता. या सातत्याच्या अडथळल्यामुळे भारतीय वाघाने त्याचा फडशा पाडला. या बछड्याचा मृत्यू कालेश्वर मंदिर परिसरातील कंपाऊंड नंबर टी-1 येथे झाला होता. हा भाग सोनहा नदीच्या किनाऱ्यावर आहे. सोनहा नदी भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमेवर आहे.
बिहारमधील वाल्मिकी टायगर रिझर्व्हमधील बछड्याच्या मृत्यूबाबत येथील वनसंरक्षक हेमाकांत राय यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन किंवा चार जानेवारी रोजी या भागात एक वाघीण दिसली होती. ही वाघीण नेपाळची होती. याच भागात एका भारतीय वाघसुद्धा दिसला होता. नेपाळची वाघीण आणि भारताचा वाघ यांच्यात मेटिंग होत होतं. मात्र बछडा त्यांना अडचण ठरत होता. याच कारणामुळे रागात येऊन वाघाणे बछड्याला मारून टाकलं. मृत्यू झालेला बछडा अवघा आठ महिन्यांचा होता. या बछड्याचे दुधाचे दातदेखील तुटलेले नव्हते. नंतर वाघीण नेपाळमध्ये परत गेली.
यापूर्वी 31 जानेवारी 2021 रोजी व्हीटीआरच्या गोबरधन वन परिक्षेत्रात वाघाचे शव सापडले होते. वर्चस्वाच्या लढाईत एका वाघाने दुसऱ्या वाघिणीला मारले होत. 13 ऑक्टोबर रोजी व्हीटीआर या भागात आणखी एका वाघाचा मृतदेह सापडला होता. दोन वाघांतील हाणामारीमुळेच याही वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर वर्षाच्या शेवटी म्हणजेच 12 डिसेंबर 2021 रोजी वाघिणीचा मृतदेह आढळला होता.
(बातमीतील छायाचित्र प्रातिनिधिक आहे)