आज दि.२२ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे ईडीच्या रडारवर; श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त

महाविकास आघाडी सरकारचे नेते ईडीच्या रडारवर असतानाच आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे ईडीच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. श्रीधर पाटणकर याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.श्रीधर पाटणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ‘पुष्पक ग्रुप’ची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून पुष्पक ग्रुपची 6 कोटी 45 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर
परतण्यास काय हरकत आहे?

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाकर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यावेळी हायकोर्टाने ही शेवटची संधी देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी कोर्टाने संपकरी संघटनेलाही फटकारलं आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास काय हरकत आहे? अशी विचारणा कोर्टाने यावेळी केली. विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी स्वीकारणार की नाही याबाबत २२ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले होते.

ज्या मैदानात दहशतवाद्यांनी 2 गोळ्या घातल्या, तिकडेच 13 वर्षांनी अंपायरचं कमबॅक

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये सीरिजची तिसरी टेस्ट मॅच सुरू आहे. सीरिजच्या सुरूवातीच्या दोन टेस्ट ड्रॉ झाल्या होत्या, यानंतर आता लाहोरमध्ये सुरू असलेली ही टेस्ट मॅच पाकिस्तानी अंपायर अहसान रझा यांच्या पुनरागमनामुळे खास आहे. 2009 साली लाहोरमध्ये श्रीलंकन टीमवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, तेव्हा अहसान रझा यांना दोन गोळ्या लागल्या होत्या. आता 13 वर्षांनंतर त्यांचं याच मैदानात पुनरागमन झालं आहे आणि ते आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग करत आहेत.

बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानेच
फडणवीस मुख्यमंत्री झाले : खडसे

जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मान्य नसावे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

हिरानंदानी समुहाच्या जवळपास २४
जागांवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी

रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी हिरानंदानी समुहावर आज(मंगळवार) प्राप्तिकर विभागाने धाड टाकली. आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. मागील काही महिन्यांपासून केंद्रीय तपास यंत्रणा बांधकाम व्यावसायिकांची चौकशी करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. हिरानंदानी समुहाच्या जवळपास २४ जागांवर प्राप्तिकर विभागाकडून आज छापेमारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, बंगळुरू येथील कार्यालयांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी कागदपत्रांची व कंपनीच्या अधिकाऱ्यांची घरांची तपासणी करत आहेत.

मावळच्या राजकारणात मतदारसंघ
पार्थ यांच्यासाठी सोडण्याची चर्चा रंगली

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा हा पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का ठरला. मात्र आता पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजेच २०२४ साठी हा मतदारसंघ शिवसेनेनं पार्थ पवार यांच्यासाठी सोडावा यासंदर्भातील मागणीवरुन आतापासून मावळ प्रांतात राजकारण रंगू लागलं आहे. महाविकास आघाडीमधील दोन मुख्य घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे. फेसबुक पोस्टमुळे मावळच्या राजकारणात मतदारसंघ पार्थ यांच्यासाठी सोडण्याची चर्चा रंगली असून यावरुन आता बारणे यांनी राष्ट्रवादीला थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करु नये असं सांगितलं आहे.

देशमुखांच्या राजीनाम्याचा
निर्णय घाईत : संजय राऊत

आम्ही राजीनामा का घ्यावा? तुम्ही चुकीच्या आरोपांवर आमच्या मंत्र्यांना फसवत आहात. अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती. नव्हता घ्यायला पाहिजे. तो निर्णय घाईघाईनं झाला असं मला वाटतं. त्यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं आहे. ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर धाडी घातल्या, तेही आम्ही पाहिलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

अखिलेश यादव यांनी दिला
खासदारकीचा राजीनामा

समाजवादी पक्षाचे (सपा) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव यांनी आजमगढ लोकसभा मतदारसंघातून तर आजम खान यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघातून आपल्या खासदारकीच राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव करहल मतदारसंघातून तर आजम खान हे रामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार होता.

त्यांना (भाजपा) कोणी सत्तेवर
आणले माहीत नाही : जया बच्चन

एएनआयशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, “हे सरकार असेच करते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखिलेश यादव यांनी तुम्ही लोक सावध राहा, असे वारंवार सांगितले होते. निवडणुकीनंतर भाव वाढणार आहेत. त्यांना (भाजपा) कोणी सत्तेवर आणले माहीत नाही.” जया बच्चन यांनी यापूर्वीही भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. प्रचारादरम्यान मडियाहुन आणि मच्छलीशहर येथील सभेला संबोधित करताना योगी आणि मोदींनी त्यांच्या झोपडीत जावे, असे म्हटले होते.

महिला २०२२च्या विश्वचषक
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया

महिला विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीची लढत रंगतदार वळणावर आली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात प्रत्येक संघाचे साखळी फेरीत सात सामने होणार आहेत. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं आहे. मात्र इतर तीन संघांबाबत संभ्रम कायम आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने उपांत्य फेरीची गणितं बदलली आहेत. त्याचबरोबर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.

ठाणे महापालिकेत नवा वाद, आयुक्त ‘शिवबंधनात’ अडकल्याचा भाजपचा आरोप

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सामना रंगला होता. तर दुसरीकडे, प्रशासकीय राजवट सुरू असतानाही शिवसेनेचे माजी महापौर व माजी नगरसेवकांसह स्मार्ट सिटीतील विकासकामांचा दौरा करणारे आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे शिवबंधनात अडकले आहेत का? असा बोचरा सवाल भाजपने केला. स्मार्ट सिटीतून पूर्ण झालेल्या कामांचे श्रेय शिवसेनेला देण्याचा आयुक्त प्रयत्न करीत आहेत का, असा आरोपही भाजपने केला आहे.

धुळ्यातील पाच कंदील परिसरातील शंकर मार्केटला आग ; 40 दुकाने खाक

धुळे शहरातील गजबजलेल्या पाच कंदील परीसरातील शंकर मार्केटला आज दुपारी अचानक आग लागली. पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मार्केटमध्ये पसरल्याने 40 दुकाने खाक होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.शाॕर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आगीची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्नीशामकच्या दलाने धाव घेतली.सुदैवाने जीवीत हानी झालेली नाही.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.